Join us

सोनू सूदचा कधीही न पाहिलेला अवतार, अंगावर शहारे आणणारा 'फतेह'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:03 IST

'फतेह' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

Fateh Movie Trailer : सोनू सूद (Ranbir Kapoor) स्टारर 'फतेह' (Fateh) हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अखेर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये सोनू सूद जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही क्षणातच या ट्रेलरला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतोय. 

२ मिनिटे ५८ सेंकदाच्या ट्रेलरमध्ये धमाकेदार ॲक्शन, डॉयलॉग पाहायला मिळताय. ट्रेलरमध्ये रक्तपात दिसून येतोय. ट्रेलरच्या शेवटी "अगली बार किरदार ईमानदार रखना जनाजा शानदार निकलेगा", असे जबदस्त वाक्य बोलताना अभिनेता दिसत आहे. या चित्रपटामध्ये जॅकलीन फर्नांडिस दमदार भूमिकेत दिसणार आहेत. हॉलिवूड स्टंट स्पेशालिस्टच्या देखरेखीखाली सिनेमतील ॲक्शन सीन्स करण्यात आले आहेत.

सोनू सूदसाठी हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली आहे. 'फतेह'च्या माध्यमातून तो दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे.  हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित असून येत्या १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सोनू सूद आणि  जॅकलीन फर्नांडिसशिवाय या सिनेमात विजय राज, नसीरुद्दीन शाह हे प्रमुख भूमिकेत आहे. 

टॅग्स :सोनू सूदजॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसेलिब्रिटी