Join us

सोशल मीडियाला कंटाळली ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:31 AM

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. फातिमा सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. पण सध्या तिने एक वेगळा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देफातिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती अनुराग बासू यांच्या चित्रपटात बिझी आहे

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. फातिमा सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. पण सध्या तिने एक वेगळा निर्णय घेतला आहे. होय, सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे. याचे कारण काय तर, सोशल मीडियाबद्दल झालेला साक्षात्कार.फातिमाच्या मते, सोशल मीडियावर लोक तासन् तास ऑनलाईन राहतात. आपल्या पर्सनल व प्रोफेशनल गोष्टी शेअर करतात. कधी कधी हे सगळे प्रचंड तणाव वाढवणारे ठरते. अनेक लोक सोशल मीडिया अ‍ॅडिक्ट झाले आहेत. यास्थितीत फातिमा सोशल मीडियापासून काही काळ दूर राहणार आहे.

‘मी स्वत: सोशल मीडियापासून ब्रेक घेऊन काही काळ निवांत राहू इच्छिते. हा वेळ मी पुस्तके वाचण्यात घालवू शकते. सध्या मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचण्याचा प्रयोग करतेय. सोशल मीडियावर अनेक तास व्यर्थ घालवण्याऐवजी वाचन करणे मला आवडेल. प्रत्येक महिन्यात चार-दोन चांगली पुस्तके वाचण्याचा निर्णय मी घेतलाय,’असे तिने सांगितले.

फातिमा तिच्या सोशल अकाऊंटवर सतत तिचे ट्रॅव्हल अपडेट देत असते. तिला फोटोग्राफीचा छंद आहे. त्यामुळे तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिने काढलेल्या फोटोंची भरमार आहे.

फातिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती अनुराग बासू यांच्या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात फातिमा राजकुमार रावसोबत दिसणार आहे. नुकतेच भोपाळमध्ये या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाले. याआधी ती आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता.

टॅग्स :फातिमा सना शेखसोशल मीडिया