Join us

फातिमा सना शेखच्या घरी लागली होती आग, फायर ब्रिगेडने आगीवर मिळवले नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 11:59 IST

दंगल गर्ल अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती.

बॉलिवूडची दंगल गर्ल अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती. ही आग जास्त पसरलेली नव्हती. फातिमाने गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

फातिमा सना शेखने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिले होते की, आता माझ्या घरी आग लागली होती. घाबरत घाबरत मी लगेच फायर ब्रिगेडला फोन लावला. काही वेळातच ते माझ्या घरी आले आणि परिस्थिती सांभाळली. थँक यू सो मच मुंबई फायर ब्रिगेड असे म्हणत तिने फायर ब्रिगेडचे आभार मानले. या पोस्टमध्ये तिने मुंबई फायर ब्रिगेडला टॅगही केले.

फातिमा सना शेखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकताच तिचा लुडो हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. अनुराग बासुने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात फातिमा सोबत पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि आशा नेगी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

याशिवाय काही दिवसांपर्वीच ती सूरज पर मंगल भारी चित्रपटात झळकली होती. लॉकडाउननंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला चित्रपट होता.

टॅग्स :फातिमा सना शेखअग्निशमन दल