Join us  

'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 5:31 PM

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. शेवटचा तो बॉलिवूड चित्रपट ए दिल है मुश्किलमध्ये दिसला होता.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान(Fawad Khan)चे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा सर्वांनाच त्याचे वेड लागले होते. त्याचा खूबसूरत, कपूर अँड सन्स हा चित्रपटही खूप आवडला होता. फवादची फॅन फॉलोइंग भारतातही खूप चांगली आहे. मात्र, २०१६ मध्ये आलेल्या ए दिल है मुश्किल चित्रपटानंतर फवाद कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसलेला नाही. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. आता ८ वर्षांनंतर फवाद बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

२०२३ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळून लावली होती, ज्यात भारतीय नागरिक, कंपन्या आणि संस्थांना पाकिस्तानी कलाकार, जसे की अभिनेता, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञ यांच्याशी सहकार्य करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदौस पी पूनीवाला यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने घोषित केले की ही याचिका सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांतता यांना चालना देण्यासाठी एक प्रतिगामी पाऊल दर्शवते आणि गुणवत्तेचा अभाव आहे.

या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, या बॉलिवूड चित्रपटात फवाद खान वाणी कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. टायटल अजून सांगितलेले नाही. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. त्याचे शूटिंगही लवकरच सुरू होणार असून त्यासंबंधीची माहितीही शेअर केली जाणार आहे.

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फवाद लवकरच बरजाक या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत सनम सईद मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. असो, चाहते फवादच्या चित्रपटांची आणि शोची आतुरतेने वाट पाहत असतात. आता बॉलिवूड चित्रपटाची माहिती मिळताच त्यांचा आनंंद द्विगुणित होणार आहे.

टॅग्स :फवाद खान