अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत ‘गोल्ड’ या चित्रपटाचे प्रदर्शन आता दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. ‘गोल्ड’च्या रिलीजच्या दोन दिवसांपूर्वी अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कपिल देव, सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, अभिनव बिंद्रा, विजेंद्र सिंह, सानिया मिर्झा,पीव्ही सिंधूसह अनेक दिग्गज भारतीय खेळाडू दिसत आहेत. या सर्व खेळाडूंनी देशासाठी ‘गोल्ड’ जिंकल्यानंतरचा अनुभव या व्हिडिओत शेअर केला आहे.
१ मिनिट ३३ मिनिटांच्या या व्हिडिओत सचिन तेंडुलकरने त्याचे अनुभव शेअर केले आहेत. आपल्या देशाचे राष्ट्रगाण ऐकणे प्रत्येक खेळाडूसाठी एक अभिमानाचा क्षण असतो़ अंगावर रोमांच उभे राहतात,’ असे सचिनने यात सांगितले आहे. ‘गोल्ड’ हा हॉकीवर आधारित चित्रपट आहे. स्वतंत्र देशाच्या रूपात भारताने आॅलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. आॅलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न असलेल्या भारतीय हॉकी टीमच्या खेळाडूंची गोष्ट आहे. यात अक्षय कुमार हॉकी कोचच्या भूमिकेत आहे. १९३७ मध्ये सुरू झालेला हॉकीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी भारतीय हॉकी टीमला १२ वर्षांचा काळ लागला. १२ आॅगस्ट १९४८ रोजी भारताने स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात हॉकीचे पहिले सुवर्णपदक मिळवले होते. यापूर्वी भारताने जी काही पदके जिंकली ती सगळी ब्रिटीश इंडियाच्या नावावर मिळत होती. येत्या १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होत आहे. रिमा कागती यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे. त्याच या चित्रपटाच्या दिग्दर्शक आहेत. यापूर्वी रीमा यांनी तलाश व हनिमून ट्रव्हलर्स प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांच्या एक्सेल इंटरटेनमेंट च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.