Join us

'फायटर'च्या दिग्दर्शकाचा अक्षय कुमारला टोमणा? म्हणाले, "असुरक्षिततेची पातळी गाठली..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:13 IST

अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ची हृतिकच्या 'फायटर'शी होतेय तुलना

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'स्काय फोर्स' (Sky Force) सिनेमा आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय हा देशभक्ती जागवणारा सिनेमा घेऊन आला आहे. यामधून अक्कीला त्याचा सुपरहिट फॉर्म पुन्हा गवसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून त्याचे सिनेमे जोरदार आपटले आहेत. 'स्काय फोर्स'ला मात्र प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मात्र सिनेमातील काही दृष्य हे हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमातील असल्याचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले आहेत. त्यांनी ट्वीट करत अक्षय कुमारला टोमणाही मारला आहे.

गेल्या वर्षी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' सिनेमा आला होता. पुलवामाच्या घटनेनंतर भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशनची कहाणी यामध्ये दाखवली होती. सिनेमातील दृश्य तर अंगावर शहारे आणणारी होती. आता अक्षयच्या 'स्काय फोर्स' मध्येही फायटर सराखेच दृश्य घेतल्याचा दावा 'फायटर' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केला आहे. अक्षय कुमारला टोमणा मारत ते लिहितात,"हाहाहा! असुरक्षिततेच्या भावनेने नीच्चांकी पातळी गाठली आहे. आज मला स्वत:वरच खूप गर्व होत आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. ते म्हणतात ना - दुसऱ्यांची मेणबत्ती विझवल्यामुळे तुमची मेणबत्ती जास्त प्रकाश देत नाही. पण ठिके..."

सिद्धार्थ आनंद यांच्या या ट्वीटवर युजर्सने त्यांचा रोख कोणावर आहे हो ओळखलं.'स्काय फोर्स' फायटरसारखी कमाई करु शकणार नाही असे एकाने लिहिले. 'फायटर' ही आतापर्यंतची सर्वात बेस्ट एरियल एक्सपिरिअन्स देणारी आहे" असं म्हणत एका युजरने सिद्धार्थ आनंद यांची बाजू घेतली आहे. 'फायटर' सिनेमाने २१२.७३ कोटींचा बिझनेस केला होता. तर जगभरात सिनेमाने ३५८.८३ कोटी कमावले होते. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडहृतिक रोशनसोशल मीडिया