Join us  

'फायटर' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट! हृतिक रोशन साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 7:52 PM

हृतिक रोशन लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत हृतिकचे चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटामधील हृतिकची एक खास झलक प्रेक्षकांना फोटोच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे.

'फायटर' या  चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती दिली आहे. या सिनेमाध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. पोस्टर शेअर करत हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया, कॉल साइन-पॅटी, डेजिग्नेशन - स्क्वाड्रन पायलट, यूनिट - एयर ड्रॅगन्स, फाइटर फॉरएव्हर'. हे पोस्टर पाहून आता चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. 

'फायटर' हा चित्रपट पुढच्या वर्षी  25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तशी ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तर दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. हृतिक आणि सिद्धार्थच्या जोडीने यापूर्वीच 'वॉर' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसिनेमा