भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला असताना सोशल मीडियावर या तणावाच्या पार्श्वभूमीवर वेगळे वाक्युद्ध सुरु झाले आहे. आता या वाक्युद्धात बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही उडी घेतली. चीनमध्ये सर्जिकल स्ट्राईकची परवानगी नाही का? असा खोचक सवाल अनुरागने ट्विटरवर केला आणि हा सवाल करून फसला. लोकांनी अक्षरश: त्याला झोडपून काढले. नेटक-यांनी अनुरागला प्रचंड ट्रोल केले. अनेकांनी यावरून त्याची खिल्ली उडवली.‘एक सवाल था, चायना में सर्जिकल स्ट्राइक अलाऊड नहीं है क्या?’ असे ट्विट अनुरागने केले. त्याच्या या ट्विटचा अर्थ कळायला लोकांना वेळ लागला नाही. यानंतर लोकांनी अनुरागला ट्रोल करणे सुरु केले.
‘डिअर अनुराग कश्यप, आपण दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते, पाकिस्तानच्या आर्मीवर नव्हते. आर्मी विरूध्द अतिरेकी आणि आर्मी विरूद्ध आर्मी यात खूप मोठा फरक आहे,’ असे एका युजरने अनुरागला सुनावले.अन्य एका युजरने तर अनुरागला अप्रत्यक्षपणे देशद्रोही ठरवले. ‘माझ्या मते, चीनआधी भारतीय लष्कर आणि सरकारला भारतात एक सर्जिकल स्ट्राईक करून येथे लपून बसलेल्या देशद्रोहींना बाहेर करून गोळ्या झाडायला हव्यात,’ असे या युजरने लिहिले.
सुमीत कंडेल नावाच्या एका युजरने तर अनुरागला चांगलेच फैलावर घेतले. ‘तू आधीच देशद्रोही होतास की मोदी पंतप्रधान बनल्यानंतर देशद्रोही झालास?’ असा खोचक प्रश्न त्याने अनुरागला केला.
एका युजरने अनुरागला पाकिस्तानीप्रेमी म्हटले. ‘सर, आम्हाला ठाऊक आहे, पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे दु:ख पाकप्रेमींना आजपर्यंत छळतेय,’ असे या युजरने लिहिले. तू कधी देशासाठी उभा होऊ शकत नाहीस का? असे अनेक प्रश्नही अनेकांनी अनुरागला केले.