सध्या अख्खे जग कोरोना संकटाचा सामना करतेय. या जीवघेण्या संकटामुळे भारताच्याही चिंता वाढल्या आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अब्जावधी माणसं आपआपल्या घरात कैद आहेत. बॉलिवूडचे बडे बडे सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. ऐरवी शूटींग, पाटर्या, प्रमोशन यातून क्षणभराचीही उसंत नसलेले सगळे बॉलिवूड स्टार्स आपआपल्या घरात बंद आहेत. अशात अनेकजण हा फावला वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. दिग्दर्शक सुजीत सरकारही त्यातलेच एक. पण हे काय? सुजीत सरकार यांना सध्या वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे.
होय, अख्खे जग कोरोनामुळे चिंतीत असताना सुजीत सरकार यांना मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर इंटिमेट सीन्स शूट करायचे तरी कसे? हा प्रश्न पडला आहे. विश्वास बसत नसेल तर सरकार यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी.‘लॉकडाऊन संपल्यावर अशा स्थितीत सिनेइंडस्ट्री इंटिमेट सीन कसे शूट करेल? विशेषत: इंटिमेट, किसींग सीन्स, एकमेकांना मिठी मारण्याचे सीन. किती जवळून, किती दूरून हे सीन शूट होतील? की मग काही काळासाठी या इंटिमेट सीन दाखवताना चीट केले जाईल?’ असे सवाल सरकार यांनी उपस्थित केले.
भन्नाट प्रतिक्रिया
सुजीत सरकारच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. जुन्या चित्रपटांप्रमाणे फुलांच्या मागे, अगदी तसेच होईल, असे एक युजरने लिहिले. अन्य एका युजरने आणखीच मजेशीर कमेंट केली. असे सीन्स शूट करण्याआधी कदाचित कलाकारांची टेस्ट केली जाईल, असे त्याने लिहिले. एकंदर काय तर सुजीत सरकार यांनी चाहत्यांनी भलतीच मजा घेतली.