Join us  

​बाहुबली 2 सोबत प्रदर्शित होणार या ‘दिग्गज स्टार’चा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 9:39 PM

हा चित्रपट कर्मशिअल व डाक्युमेंट्रीचा मिलाफ असेल

एस.एस. राजमौली यांचा ‘बाहुबली 2’ च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून 14 एप्रिल 2017 रोजी हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित केला जाणार आहे. यामुळे बहुतांश चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन या दरम्यान ठेवले नाही. मात्र एका महान स्टारवर आधारित चित्रपट ‘बाहुबली 2’सोबत प्रदर्शित होणार आहे. भारताचा महान क्रि केटपटू भारतरत्न सचिन तेंदुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन : ए बिलियन्स ड्रीम्स’ हा चित्रपट 14 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘सचिन : ए बिलियन्स ड्रीम्स’ हा चित्रपटाची निर्मिती जेम्स एर्सकिन यांनी केली असून यात सचिनच्या जीवनातील अनेक गोष्टी दाखविण्यात येणार आहे. ‘सचिन : ए बिलियन्स ड्रीम्स’ हा चित्रपट कर्मशिअल व डाक्युमेंट्रीचा मिलाफ असेल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सचिन दिसणार असल्याने या चित्रपटला चांगली ओपनिंग मिळेल असेही सांगण्यात येते. एप्रिल महिन्यातच सचिनचा वाढदिवस येत असल्याने हा चित्रपट त्याआधी प्रदर्शित व्हावा असे निर्मात्यांना वाटत होते. दुसरीकडे बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनने हिंदी बेल्टमध्ये देखील कमाल करीत बॉक्स आॅफिसवर 100हून अधिक व्यवसाय केला होता. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बाहूबलीचा उल्लेख होत आहे. बाहुबलीचे कथानक असे गुंफण्यात आले आहे की प्रेक्षकांना दुसºया भागाची प्रतीक्षा राहावी. बाहुबलीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यावर अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाला फटका बसू नये यासाठी प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. सचिन तेंदुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चर्चा होत असल्याने व आंतराष्ट्रीय स्तरावर त्याचे एकाचवेळी प्रदर्शन होत असल्याने ‘सचिन : ए बिलियन्स ड्रीम्स’ हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.