Join us

स्टार्सनी घेतला पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 2:57 PM

लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनीच तीव्र शब्दात निंदा केली. या घटनेने बॉलिवूडस्टार्सही खवळले आणि त्यापैकी काही कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. 

रवींद्र मोरे 

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. या आत्मघातकी हल्ल्यानंतर दहशतवादावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनीच तीव्र शब्दात निंदा केली. या घटनेने बॉलिवूडस्टार्सही खवळले आणि त्यापैकी काही कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. 

* टोटल धमाल

अजय देवगनचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट भारतात सर्वत्र २२ फेबु्रवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अजय देवगन आणि टीमने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात अजय देवगनबरोबर अभिनेता अनिल कपूर, रितेश देशमुख आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स आॅफिसवर चांगलीच मजल मारली आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी १६ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 

* लुका-छुपी 

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा ‘लुका- छुपी’ चित्रपटदेखील पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार नाही. १ मार्चला प्रदर्शित होणाºया या सिनेमाच्या निर्मात्यांनी पाकिस्तानात सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडे या चित्रपटाचे पाचवे गाणे रिलीज झाले असून अगोदरच्या चारही गाण्यांप्रमाणेच हे गाणेही रिक्रियट करण्यात आले आहे. या गाण्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.   

* सोनचिडिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार पुलवामा हल्ल्यानंतर आता सुशांत सिंग राजपूतचा ‘सोनचिडिया’ सिनेमाही पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. येत्या १ मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर स्टारर सिनेमा हा चित्रपट वादाच्या भोवºयात अडकला आहे. सिनेमाच्या चंबलच्या खोºयातील डाकूंच्या जीवनावर आधारलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिनेमात चित्रित करण्यात आलेले सिन्स आणि डायलॉगमुळे सिनेमाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.     

* मेड इन चायना

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित न होणा-या यादीत मौनी रॉय आणि राजकुमार राव यांचा ‘मेड इन चायना’ सिनेमाचाही समावेश आहे. मेडॉक्स फिल्म्सने त्यांचा कोणताच सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाद्वारा राजकुमार राव आणि मौनी रॉय पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. यात राजकुमार राव एका स्ट्रगलिंग बिझनेसमनची तर मौनी त्याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.  

* भारत 

सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘भारत’ पाकिस्तानात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सलमानने नुकतेच आतिफ असलमला त्याच्या आगामी सिनेमातून वगळल्यामुळे तो पाकिस्तानात सिनेमा प्रदर्शित करणार नाही असं म्हटलं जात आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. यात सलमान बरोबरच  दिशा पटानी, प्रकाश राज, आशीष विद्यार्थी, सुनील ग्रोवर, महेश मांजेरकर कलाकार दिसणार आहेत.

टॅग्स :एअर सर्जिकल स्ट्राईकसोन चिरैयाभारत सिनेमा