Sawan Kumar Tak : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:02 PM2022-08-25T19:02:38+5:302022-08-25T19:29:54+5:30

:प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचं आज मुंबईत निधन झालंय.

Film maker Saawan Kumar Tak passes away due to heart attack | Sawan Kumar Tak : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन

Sawan Kumar Tak : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन

googlenewsNext

Saawan Kumar Tak Passed Away :प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचे आज दुपारी ४.१५ च्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

सावन कुमार यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा पुतण्या नवीन टाक यांनी दिली आहे. याबाबत एका मीडिया हाऊसशी बोलताना त्यांनी सांगितले की, ते बऱ्याच दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. अलीकडे त्याला खूप अशक्तपणा जाणवत होता आणि त्यांना तापही आला होता. त्यांनी सांगितले की, तपासादरम्यान त्यांचे हृदयही नीट काम करत नसल्याचे आढळून आले.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. सलमानने त्याच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सलमानने ट्विट केले की, 'तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्हाला नेहमीच प्रेम आणि आदर मिळो.

सावन कुमार टाक हे बॉलीवूडमधील अशा निर्माते दिग्दर्शकांपैकी एक होते ज्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत चित्रपट केले. त्यांनी संजीव कुमार ते सलमान खान पर्यंत अनेकांनासोबत काम केले. त्याने सलमानसोबत 'सावन' हा चित्रपट बनवला आहे. याशिवाय, ते संजीव कुमार आणि मेहमूद जूनियर उर्फ ​​नईम सय्यद यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना इंडस्ट्रीत ब्रेक देण्यासाठी ओळखले जाता. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट मीना कुमारीसोबत 'गोमती के किनरे' होता.
 

 

Web Title: Film maker Saawan Kumar Tak passes away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.