पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आता तिच्यावर बनत असलेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. निर्माते अमित जानी (Amit Jani) सीमा हैदरवर सिनेमा बनवत आहेत. सगळीकडून विरोध होत असूनही ते सिनेमा बनवण्यावर ठाम आहेत.'कराची टू नोएडा' असं सिनेमाचं नाव असून पहिलं पोस्टरही रिलीज झालं आहे. तर चित्रपटातील पहिलं गाणं 'चल पडे है हम' लवकरच प्रदर्शित होईल अशी माहिती अमित जानी यांनी ट्वीट करुन दिली आहे.
पाकिस्तानची सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीना यांच्या प्रेमकहाणीची सध्या जोरदार चर्चा आहे. सचिनवरील प्रेमासाठीच सीमा पाकिस्तानची सीमा पार करुन भारतात आली आहे. मात्र ती जासूस असल्याचा संशय आल्याने तिची चौकशी सुरु आहे. हीच कहाणी अमित जावी मोठ्या पडद्यावर दाखवण्यास सज्ज झाले आहेत. 'कराची टू नोएडा' या सिनेमात मॉडेल फरहीन फलक ही सीमा हैदरच्या भूमिकेत आहे. भरत सिंह सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
२० तारखेला रिलीज होणार पहिलं गाणं
कराची टू नोएडा सिनेमाचं पहिलं गाणं 'चल पडे है हम' २० तारखेला रिलीज होणार आहे. पोस्टरमध्ये त्याचीच झलक दिसत आहे. तसंच मॉडेल फरहीन फलकचे तीन लुक दाखवण्यात आले आहेत. फरहीनचा चेहरा सीमा हैदरशी फारच मिळता जुळता आहे. एका लुकमध्ये तिने हिजाब घातलेला आहे, दुसऱ्या लुकमध्ये ती साडीत दिसते आहे तर तिसऱ्या लुकमध्ये ती त्रासलेली दिसत असून मोकळे केस सोडले आहेत.
सीमा आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी फारच निराळी आहे. पबजी गेम खेळता खेळता त्यांच्यात प्रेम फुललं. त्यांचं प्रेमप्रकरण इतकं वाढलं की दोन मुलांची आई असलेली सीमा सगळं सोडून लपतछपत पाकिस्तानातून भारतात आली. सचिनसोबतच राहायला लागली.जेव्हा त्यांचं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा एकच हंगामा झाला.दोघेही कायद्याच्या कचाट्यात अडकले. आता त्यांच्यावर सिनेमा येत आहे.