Join us

कंगना राणौत जे काही करतेय ते आत्मघातासारखेच! अपूर्व असरानींचे ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 9:21 PM

पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणौतचा वाद तसा जुनाच. ‘सिमरन’ या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणौत यांचे बिनसले होते. 

पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणौतचा वाद तसा जुनाच. ‘सिमरन’ या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणौत यांचे बिनसले होते. आता अपूर्व असरानीने पुन्हा एकदा कंगनाला लक्ष्य केले आहे. अपूर्व यांनी एका ट्विटमधून कंगनावर हल्ला चढवला आहे.चित्रपटात कॅमेऱ्याच्या मागेही लुडबूड करणे, लोकांवर वरचढ होणे आणि आपलेच ते खरे करण्याचा स्वभाव कंगनासाठी ‘हारा-किरी’सारखे (आत्मघात) आहे. स्वत:लाचं गर्तेत ढकलण्याचे काम कंगना करतेय, असे त्यांनी म्हटले आहे. 

‘एक स्टार चित्रपटाला हायजॅक करतेय. युनिटच्या अन्य सदस्यांनी घेतलेल्या कष्टांना कमी लेखण्याचे दबावतंत्र आत्मघाताचा सर्वात हिन प्रकार आहे. या प्रकाराला बळी पडलेल्या व्यक्ती हे सगळे नियंत्रित न करता चुप्पी साधत एका गर्विष्ठ व्यक्तिला उपद्रव करण्यासाठी रान मोकळे करून देतात आणि एक अख्खा चित्रपट बर्बाद होतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

‘सिमरन’ या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता. कारण अपूर्वचे मानाल तर त्याने या कथेसाठी त्याच्या आयुष्याची दोन वर्षे दिली हो. 

 

टॅग्स :कंगना राणौत