Join us

Filmfare Awards 2019: अंधाधुन, बधाई हो आणि राझी या चित्रपटांनी फिल्मफेअर पुरस्कारामध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 11:17 PM

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याला चार चाँद लावले.

ठळक मुद्देया पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा २३ मार्चला म्हणजेच आज मुंबईतील जिओ गार्डन येथे रंगला. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याला चार चाँद लावले. या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पाहूया कोणी मारली बाजी...

सर्वोत्कृष्ट चित्रपटराझी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकमेघना गुलजार (स्त्री)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)अंधाधुन

सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर (संजू)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)रणवीर सिंग (पद्मावत)आयुषमान खुराणा (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअलिया भट (राझी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)नीना गुप्ता (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेतागजराज राव (बधाई हो)विकी कौशल (संजू)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीसुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)ईशान खट्टर 

सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)सारा अली खान 

सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)अमन कौशिक (स्त्री) 

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमपद्मावत (संजय लीला भन्साळी)

सर्वोत्कृष्ट गीतकारऐ वतन (गुलजार-राझी)

सर्वोत्कृष्ट गायक अर्जित सिंग (ए वतन-राझी)

सर्वोत्कृष्ट गायिकाश्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)

सर्वोत्कृष्ट कथामुल्क (अनुभव सिन्हा)

सर्वोत्कृष्ट पटकथाअंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव)

सर्वोत्कृष्ट संवादबधाई हो (अक्षत घिलडील)

सर्वोत्कृष्ट एडिटिंगपूजा सुरती (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट ऍक्शन विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स (मुक्काबाज)

सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोरअंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीकृती महेश मिड्या, ज्योती डी तोमर  (घुमर - पद्मावत)

सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीपंकज कुमार (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शननितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनकुणाल शर्मा (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट वीएफएक्सरेड चिलीज (झीरो)

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्ड