Join us

Filmfare Awards 2020 Memes : नेटक-यांनी घेतली ‘गली बॉय’ची मजा, Memes पाहून खो-खो हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:42 IST

Filmfare Awards 2020 Memes : काही भन्नाट Memes...

फिल्मफेअर अवार्डची घोषणा झाली. या सोहळ्यात आलिया भट व रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ने 13 पुरस्कार जिंकत सर्व विक्रम तोडले. रणवीर व आलिया दोघांनाही या सिनेमासाठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची दिग्दर्शिका जोया अख्तर हिला बेस्ट डायरेक्टरचा तर सिद्धांत चतुर्वेदी आणि अमृता सुभाष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणखीही अनेक पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केलेत. पण अशाच ट्विटरवर बॉलिवूडप्रेमी अ‍ॅक्टिव्ह झालेत आणि मजेदार मीम्स आणि जोक्सचा पूर आला. या मीम्सनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले.सर्वाधिक मीम्स आणि जोक्स शेअर केले गेलेत ते ‘गली बॉय’वरून. या पुरस्कार सोहळ्याचे नाव ‘फिल्मफेअर’ नाही तर ‘गली अवार्ड’ ठेवा, अशा आशयाचे मीम तर प्रचंड व्हायरल झाले.

याचे नाव ‘गली अवार्ड’ ठेवू

आलियाबद्दल कुणी काहीही बोलायचे नाही...

तौबा तौबा तौबा... सारा मूड खराब कर दिया

हृतिक भैय्या को आया रोना...

नीचे से चेक कर... नीचे से...

पाहा, काही भन्नाट मीम्स...

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डमिम्सगली ब्वॉय