Join us

कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्या प्रकारच्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 8:54 AM

करण जोहरची प्रतिक्रिया चर्चेत; 'थप्पड' प्रकरणावर केलं भाष्य

अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतसोबत (Kangana Ranaut) चंदीगढ विमानतळावर विचित्र घटना घडली. CISF महिला सुरक्षाकर्मीने तिला कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनावेळी कंगनाने केलेल्या एका वक्तव्याचा महिलेच्या मनात राग होता. या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी सुरक्षारक्षक महिलेची बाजू घेतली आहे तर कोणी या घटनेची निंदा केली आहे.  या प्रकरणावर आता दिग्दर्शक करण जोहरने प्रतिक्रिया दिली आहे. 

करण जोहरच्या 'किल' चित्रपटाचा ट्रेलर 12 जून रोजी रिलीज झाला होता. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला करण जोहरही उपस्थित होता. यावेळी त्याला कंगना रणौतच्या थप्पड प्रकरणावर विचारण्यात आलं. यावर करणचं उत्तर ऐकूण उपस्थितींनी त्याचं कौतुक करत टाळ्या वाजवल्या.  करण जोहर म्हणाला की, 'मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, मग ती शाब्दिक असो किंवा शारीरिक'. 

कंगना आणि करण या दोघांममध्ये कायम छत्तीसचा आकडा असल्याने करण जोहरची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी आहे. मनोरंजनसृष्टीतून अनेक जण कंगनाच्या बाजूने उभे राहिले. रवीना टंडन, उर्फी जावेद,अनुपम खेर, अध्ययन सुमन, शेखर सुमन, अशोक पंडित यांनी या घटनेची निंदा केली. तर दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनिया, इतर काही खेळाडू, संगीतकार विशाल ददलानीने महिलेची बाजू घेतली आहे.

दरम्यान, कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिलेचं नाव कुलविंदर कौर आहे. तिला आता निलंबित करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान तिची आईदेखील आंदोलनात बसली होती. या महिलेला पैसे घेऊन आंदोलनाला बसल्या आहेत असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. याचाच राग कुलविंदरच्या मनात होता. कंगना राणौतने नुकतंच लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला. तसंच मंडीतील जनतेची सेवा करण्यासाठी आता ती बॉलिवूड कायमचं सोडणार असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :करण जोहरसेलिब्रिटीबॉलिवूड