-रवींद्र मोरे
भारताच्या इतिहासात २६/११ ची तारीख एक काळा दिवस म्हणून गणला जातो. २००८ मध्ये लश्कराच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसह ७ ठिकाणी हल्ला केला होता. दहशतवाद्यांसोबत भारतीय सेना आणि पोलिसांचे हे आॅपरेशन सुमारे तीन दिवसांपर्यंत चालले. या हल्लयात १६० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते तर ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या हल्लयात पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आली होती. या दहशतवादी हल्लयानंतर २६/११ नावाचा एक चित्रपट बनला होता, जो मुंबई हल्लयाचा पूर्ण घटनाक्रम दर्शवितो. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये दहशतवादी हल्लयांवर आधारित अजूनही काही चित्रपट बनले आहेत, जे प्रेक्षकांना खूपच आवडलेही आहेत. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...
* 26/11राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत होता. २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लयाचा पूर्ण घटनाक्रम या चित्रपटात दाखविण्यात आला आहे, जो अंगावर शहारे आणणारा आहे.
* बेबीअक्षय कुमार, अनुपम खेर आणि तापसी पन्नू स्टारर नीरज पांडेने दिग्दर्शित बेबी हा एक २०१५ साली प्रदर्शित झालेला बॉलिवूड थरारपट आहे. बेबीचे काल्पनिक कथानक भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडणाऱ्या एका सुरक्षा पथकाच्या साहसकथांवर आधारित आहे. या चित्रपटास टीकाकार व प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद लाभला. विशेषत: अक्षय कुमारच्या अभिनयाचे व नीरज पांडेच्या दिग्दर्शनाचे समीक्षकांनी कौतुक केले.
* फॅँटमसैफ अली खान आणि कॅटरिना कैफचा हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते, तर साजिद नाडियलवाला यांची निर्मिती होती. हा चित्रपटही २००८ च्या दहशतवादी हल्लयाचा घटनाक्रम आणि वैश्विक दहशतवादावर आधारित होता.
* ए वेडनेसडेमुंबई दहशतवादी हल्लयाशी संबंधित हा चित्रपट आहे. या चित्रपटात नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर आणि जिम्मी शेरगिलची मुख्य भूमिका आहे. २००९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटास अनेक पुरस्कारांनी सन्मनित करण्यात आले आहे.
* ब्लॅक फ्रायडेहा चित्रपटही १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारित आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात के.के. मेनन, आदित्य श्रिवास्तव, पवन मल्होत्रा, किशोर कदम आणि जाकिर हुसैन यांची मुख्य भूमिका होती.