Join us

चित्रपटांनी दाखवले दहशतवाद्यांचे कौर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:13 AM

पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा माथेफिरूंच्या कौर्याची चर्चा सुरू झाली आहे. जनसामान्यांना त्रस्त करणार्‍या या समस्येचे गंभीर चित्रण ...

पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा माथेफिरूंच्या कौर्याची चर्चा सुरू झाली आहे. जनसामान्यांना त्रस्त करणार्‍या या समस्येचे गंभीर चित्रण बॉलिवूडच्या चित्रपटात करण्यात आले आहे. ८0 च्या दशकात देशात जेव्हा दहशतवादाने जलदगतीने पाय पसरायला सुरुवात केली तेव्हा बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी त्याची गंभीरतेने दखल घेतली. ८0 च्या दशकात सुभाष घई यांनी कर्मा व शेखर कपूर यांनी मि. इंडियामध्ये दहशतवादाला चित्रीत केले. ९0 व्या दशकात जशा घटना वाढत गेल्या तसे त्या विषयांवरील चित्रपटांची देखील निर्मिती होत गेली. दक्षिण भारताचे दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांनी जेव्हा रोजा बनविला तेव्हा या चित्रपटाने संपूर्ण देशात चांगला व्यवसाय केला. काश्मिरी दहशतवादावर आधारित या चित्रपटात प्रथमच काश्मिरी दहशतवाद्यांच्या तमाम घटनांना एकत्रीत मांडण्याचा एक गंभीर प्रयत्न के ला गेला होता आणि देशातल्या सामान्य जनतेने या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला होता. गुलजार यांच्या माचिस चित्रपटालाही खूप प्रशंसा मिळाली. गोविंद निहलानींचा द्रोहकालही याच क्रमातला चित्रपट. आशिष विद्यार्थी सारख्या नव्या चेहर्‍यांसोबत बनलेल्या या चित्रपटाने जनमानसात कुतूहल निर्माण केले होते. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही, पण या चित्रपटाने काश्मिरी आंतकवादाचे दु:ख पुन्हा एकदा जगासमोर आणले. यानंतर काश्मिरी दहशतवादावर आधारित अनेक चित्रपट बनले ज्यात राजकुमार संतोषींचा पुकार(अनिल कपुर-माधुरी दिक्षित) आणि विधू विनोद चोपडाचा मिशन काश्मीर यांची नावे प्रामुख्याने घेता येतील