Join us

अखेर आमिर खानची लेक आयरा झाली मिसेस शिखरे; कायदेशीररित्या अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 10:40 PM

आमिर खान(Aamir Khan)ची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) हिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत आज लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरिज केले आहे.

आमिर खान(Aamir Khan)ची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) हिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत आज लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरिज केले आहे. त्यांच्या कोर्ट मॅरेजची पहिली झलक समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हे जोडपे त्यांच्या लग्नाची नोंदणी करताना पाहायला मिळाले. 

गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानचे चाहते त्याची मुलगी आयरा खानच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर आज आयरा मिसेस शिखरे झाली आहे. आयरा आणि नुपूरने कोर्ट मॅरिज करत लग्नगाठ बांधली आहे. यावेळी आयरा आणि नुपूरसोबत खान आणि शिखरे कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे दोघेही खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी आयरा नववधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत होती. आयराने ग्रीन रंगाचा ब्लाउज आणि व्हाइट रंगाची धोती पॅण्ट आणि त्यावर हिरव्या रंगाची ओढणी घेतली होती. मात्र कोर्ट मॅरिजवेळी नुपुरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. नुपुरेने हाफ पँट आणि टी-शर्ट मध्ये आयरासोबत लग्न केले. त्यानंतर त्याने आयराला मॅचिंग हिरव्या रंगाची शेरवानी घातली. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.  

 

टॅग्स :इरा खानआमिर खान