Join us  

अखेर घटस्फोट झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2016 10:26 AM

करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटावर अखेर फॅमिली कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता दिल्यानंतर ...

करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटावर अखेर फॅमिली कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता दिल्यानंतर त्या दोघांचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत. सप्टेंबर २००३मध्ये अतिशय शाही अंदाजात करिश्मा कपूरचा विवाह उद्योजक संजय कपूरसोबत झाला होता. पण काहीच वर्षांत त्यांच्यात वाद व्हायला लागले. २०१० पासून करिश्मा वेगळी राहात असून २०१३ साली त्या दोघांनी सामंजस्यांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. पण मुलांच्या पालनपोषणासाठी ठरवून दिलेली रक्कम संजय देत नसल्याचे कारण देत करिश्माने दिलेली संमती मागे घेतली होती. पण आता संजयने करिश्माच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. मुलांचा ताबा करिश्माकडे राहाणार असून संजयला महिन्यातले काही दिवस त्यांना भेटायला मिळेल अशी परवानगी कोर्टाने याआधीच दिलेली आहे. खारमध्ये संजयच्या वडिलांच्या नावाने असलेला बंगला संजयने करिश्माच्या नावावर केला असून मुलांच्या नावाने १४ करोडचे बाँड बनवले आहेत. यातून दर महिन्याला १० लाख रुपये व्याजाच्या रूपाने मुलांना मिळणार आहेत.