Join us

अखेर जया बच्चन पापाराझींसाठी हसल्याच! पण त्यातही आहे एक ट्विस्ट; नातीने घेतली आजीची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 08:52 IST

बच्चन यांची नात नव्या नवेलीने फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना नेहमीच कॅमेऱ्यासमोर रागातच पाहिलं आहे. अनेकदा पापाराझींवर चिडताना त्या दिसतात. जया बच्चन यांना आवाज द्यायची किंवा त्यांच्याशी बोलायची कोणत्याही पापाराझीची आता हिंमतही होत नसेल. मात्र अखेर जया बच्चन कॅमेऱ्यासमोर हसल्या आहेत. तरी यातही एक ट्विस्ट आहे. बच्चन यांची नात नव्या नवेलीने (Navya Naveli) फोटो शेअर करत आपल्या आजीची मजा घेतली आहे.

जया बच्चन कायम गंभीर मूडमध्येच असतात हे फक्त माध्यमांना किंवा चाहत्यांना नाही तर अगदी बच्चन कुटुंबालाही माहित आहे. म्हणूनच अनेकदा स्वत: अमिताभ बच्चन असो किंवा अभिषेक बच्चन यांनी जया यांची मजा घेतली आहे. आता श्वेता बच्चनची लेक नव्या नवेलीने आजीची मजा घेतली आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये नव्या नवेलीने यंदा पदार्पण केलं. दरम्यान तिथला एक फोटो तिने स्टोरीमध्ये पोस्ट केलाय. यामध्ये जया बच्चन हसताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, 'अखेर पापाराझींसाठी हसली.'

नव्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. यंदा पॅरिस फॅशन वीकमध्ये नव्याला पाठिंबा देण्यासाठी आई श्वेता आणि आजी जया बच्चन पॅरिसमध्ये दाखल झाल्या होत्या. तसंच ऐश्वर्या राय बच्चनही या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. मात्र श्वेता आणि जया केवळ नव्याला चिअर करताना दिसल्या. तर ऐश्वर्यासोबत फक्त आराध्या होती. यामुळे नणंद भावजयमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं.

टॅग्स :जया बच्चननव्या नवेलीव्हायरल फोटोज्