Nawazuddin Siddiqui News : गेल्या काही काळापासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद सुरू होता. अखेर बुधवारी तो त्याच्या मूळ गावी मुझफ्फरनगरला पोहोचला आणि मालमत्तेचा वाद संपुष्टात आला. चित्रपटाचे शूटिंग मध्येच सोडून नवाजने बुढाणा तहसील गाठली आणि वडिलोपार्जित जमिनीचे पॉवर ऑफ अॅटर्नी त्याच्या 3 भावांच्या नावावर देऊन जमिनीच्या वादापासून स्वतःला दूर केले.
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली वडिलोपार्जित जमीन आपला भाऊ अलमाशच्या नावावर केली आहे. याबाबत माहिती देताना नवाजुद्दीनचा भाऊ फैजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले की, नवाज भाईचे शूटिंग सुरू होते, मात्र हा वाद संपवण्यासाठी तो आपले काम सोडून येथे आला होता. ती आमच्या वडिलांची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. भावांनी नवाजवर अनेकदा आरोप केले की, तो मालमत्तेची वाटणी करत नाही. पण, अखेर त्याने संपत्ती भावांना दिली.
नवाजुद्दीन मीडियापासून दुरफैजुद्दीन म्हणाला की, नवाज भाईच्या वाट्याला असलेली सर्व वडिलोपार्जित संपत्ती तीन भावांच्या नावावर परत केली आहे. 7 भावांपैकी आमचे भाऊ अलमाश भाई यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी या मालमत्तेतून माझे नाव काढून घेतोय, असे नवाजने म्हटले. नवाज बुढाणा तहसीलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने मीडियापासून अंतर ठेवले.
काय वाद?6 महिन्यांपूर्वी नवाजुद्दीनच्या कुटुंबातील प्रॉपर्टी वादाचे प्रकरण समोर आले होते. नवाजुद्दीनने बुढाणा येथील वडिलोपार्जित रेस्टॉरंटचे उद्घाटन केले होते, यानंतर त्यांच्या भावाने पत्रकार परिषद घेऊन वडिलोपार्जित मालमत्तेवर रेस्टॉरंट बांधणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले.