सायना नेहवालच्या बायोपिकबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. निर्माते अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या बायॉपिकचे शूटिंग नुकतेच सुरू केले आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर ही सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे. सायनाने २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही पदक जिंकले होते.
या भूमिकेबाबत श्रद्धा म्हणाली, 'या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. सायना ही देशाची चाहती असून, एक विजेती आणि यूथ आयकॉन आहे. कोणत्याही कलाकारसाठी ही भूमिका चॅलेंजिंग आहे.'या शूटिंगवेळी सायनाचे कुटूंबिय सेटवर उपस्थित राहणार आहे का? असे श्रद्धा कपूरला विचारले असता ती म्हणाली, 'मला आशा आहे की ते सर्वजण सेटवर उपस्थित राहतील. ते उपस्थित राहिल्यास मला आनंदच होईल आणि आम्हाला प्रोत्साहन मिळेल.'भूषण कुमार प्रोडक्शन निर्मित या चित्रपटासाठी श्रद्धा खूपच ट्रेनिंग घेत आहे. श्रद्धा म्हणाली,' ट्रेनिंगसाठी रोज सकाळी मी सहा वाजता उठते. श्रद्धाला सायनाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्या दोघींचे चाहते खूप उत्सुक आहेत. '२०१७ हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसे चांगले गेले नाही़. कारण या वर्षांत आलेले 'ओके जानू' आणि 'हसीना पारकर' हे तिचे दोन्हीही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरले. श्रद्धाचा 'स्त्री' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तसेच यातील श्रद्धाचे काम प्रेक्षकांना खूप भावले. नुकताच तिचा 'बत्ती गुल मीटर चालूू' रिलीज झाला. या सिनेमालाही रसिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे. त्यानंतर ती 'बाहुबली' फेम प्रभाससोबत 'साहो'मध्ये झळकणार आहे.