Join us

​अखेर दिसला सोहा अली खानची लेक इनायाचा चेहरा! डॅड कुणाल खेमूने बालकदिनी शेअर केला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:16 AM

सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रीय आहे. तैमूरला सोबत ...

सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रीय आहे. तैमूरला सोबत करण्यासाठी त्याची आतेबहीण अर्थात इनाया नौमी ही सुद्धा सोशल मीडियावर आली आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते तुम्हाला कळले असेलच. होय, तैमूरची आत्या सोहा अली खान हिची मुलगी इनाया हिच्याबद्दल. इनायाचे डॅड कुणाल खेमू यांनी इनायाचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. इनायाच्या या फोटोने अनेकांना आपले फॅन बनवले आहे. येत्या काळात तैमूरला कडवी टक्कर मिळणार, हे या फोटोवरून तरी दिसतेयं.इनायाचा फोटो यासाठीही खास आहे कारण, डॅड कुणाल खेमूने हा फोटो शेअर करण्यासाठी आज बालकदिनाचे मुहूर्त शोधले आहे. इनायाचा हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘मी जगातील सर्व मुलांना बालकदिनाच्या शुभेच्छा देतो. तुमचे बालपण आम्हा मोठ्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देते. हॅपी चिल्ड्रन्स डे.’काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कुणाल इनायाबद्दल बोलला होता. इनायाच्या जन्माने माझे आयुष्यचं बदलले आहे. खाण्या-पिण्यापासून झोपण्याची वेळही बदलली आहे. आता मी अधिकाधिक वेळ घरात घालवू इच्छितो, जेणेकरून मुलीसोबत वेळ घालवू शकेल. आता इनाया १९ ते २० तास झोपलेली असते, असे तो म्हणाला होता.ALSO READ : सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या मुलीची इन्स्टाग्रामवर एन्ट्रीकुणाल खेमू स्वत: बालकलाकार राहून चुकला आहे. आता कुणाल स्वत: एका मुलीचा बाप आहे. याबद्दल विचारल्यावर, होय, मला स्वत:लाही मी बाप झालोय, यावर कधीकधी विश्वास बसत नाही. ही एक जगावेगळी फिलिंग आहे. मी प्रत्येक दिवस एन्जॉय करतो आहे, असे कुणाल म्हणाला होता.कुणाल आणि सोहा २०१५ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. गत २९ सप्टेंबरला सोहाने इनायाला जन्म दिला होता. जन्मानंतर लगेच सोहाने इनायाचा डॅडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अर्थात या इनायाचा चेहरा दिसला नव्हता.