Join us

अखेर तमन्ना भाटियानं तब्बल १८ वर्षांनंतर मोडला नो किसिंग रुल, यासाठी हा अभिनेता आहे कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 4:15 PM

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाने साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पडद्यावरच्या तिच्या वेगळ्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तमन्ना भाटियाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे, परंतु तिने अद्याप कोणत्याही प्रकारचे किसिंग किंवा रोमँटिक सीन पडद्यावर दिलेले नाहीत.

तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)ने साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पडद्यावरच्या तिच्या वेगळ्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तमन्ना भाटियाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे, परंतु तिने अद्याप कोणत्याही प्रकारचे किसिंग किंवा रोमँटिक सीन पडद्यावर दिलेले नाहीत. ती नेहमीच नो किसिंग पॉलिसी अंतर्गत काम करते. मात्र आता तमन्ना भाटियाने हा नियम मोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे तिने केवळ एका अभिनेत्यासाठी नो किसिंग पॉलिसीचा नियम मोडला आहे.

विजय वर्मा असे या अभिनेत्याचे नाव आहे. वास्तविक तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या त्यांच्या पुढील प्रोजेक्ट 'लस्ट स्टोरीज २' साठी चर्चेत आहेत. अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाउंटवर 'लस्ट स्टोरीज २' चा टीझर शेअर केला आहे. ज्यामध्ये या प्रोजेक्टशी संबंधित सर्व कलाकार त्यांच्या भूमिकांबद्दल बोलत आहेत. टीझरमध्ये प्रत्येकजण वासना आणि प्रेमाच्या सीनबद्दल बोलत आहे. या व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाला जेव्हा कळते की विजय वर्मासोबत किसिंग आणि रोमँटिक सीन द्यायचे आहेत, तेव्हा ती कूल म्हणते. म्हणजे बाहुबली अभिनेत्रीला त्याच्यासोबत किसिंग सीन करायला काहीच हरकत नाही.

बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्याविषयीच्या बातम्या येत आहेत की ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अलीकडेच, पहिल्यांदाच विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी स्वतः एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. तमन्ना भाटिया देखील अनेकदा विजयबद्दल बोलत असते.

टॅग्स :तमन्ना भाटिया