Join us

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चे नवीन पोस्टर आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 4:58 PM

Akshay Kumar : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या अपयशानंतर अक्षय कुमार त्याचा नवीन चित्रपट 'सरफिरा' घेऊन येत आहे. या चित्रपटाची घोषणा काही काळ आधीच झाली होती. आता अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या अपयशानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याचा नवीन चित्रपट 'सरफिरा' (Sarfira movie) घेऊन येत आहे. या चित्रपटाची घोषणा काही काळ आधीच झाली होती. आता अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना त्याने सांगितले की, 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या दिवशी भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'सरफिरा' चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. वाढलेली दाढी आणि सनग्लासेस घातलेला अक्षय कुमार खूपच देखणा आणि स्टायलिश दिसत आहे. पोस्टरमध्ये 'एवढी मोठी स्वप्न पाहा की लोक तुम्हाला वेडा म्हणतील' अशी टॅग लाइन आहे.

'सरफिरा'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीलापोस्टरची झलक दाखवत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस करणाऱ्या माणसाची कथा. माझ्यासाठी ही एक कथा, एक पात्र, एक चित्रपट आणि संपूर्ण आयुष्यासाठी एक संधी आहे. सरफिराचा ट्रेलर १८ जून २०२४ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमार व्यतिरिक्त दिसणार हे कलाकारअक्षय कुमारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. यामध्ये परेश रावल, राधिका मदन आणि सीमा बिस्वास हे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी लिहिली आहे.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट'सराफिरा' व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट आहेत जे एकापाठोपाठ एक चित्रपटगृहात दाखल होतील. या यादीत हाऊसफुल ५, स्काय फोर्स, हेरा फेरी ३ आणि जॉली एलएलबी ३ यांचा समावेश आहे. अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाला होता, अशी माहिती आहे. हा सिनेमा ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. बडे मियाँ छोटे मियाँ अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :अक्षय कुमार