Join us

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाहिला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा', ट्विट करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 5:09 PM

‘कांतारा’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. अनेक दिग्गजांनी या सिनेमाचे कौतुक केलं. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चित्रपटाबाबत ट्विट केलं आहे.

कन्नड भाषेतील 'कांतारा' (Kantara Movie) चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली. कांतारा दक्षिणेत इतका यशस्वी झाला की निर्मात्यांनी तो हिंदीत डब करून सिनेमागृहात प्रदर्शित केला. हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळाला

 

प्रेक्षकांपासून चित्रपट समीक्षकांपर्यंत अनेक दिग्गजांनी या सिनेमाचे कौतुक केलं. आता अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी हा चित्रपट  पाहिला आहे. यानंतर त्यांनी ट्विटरवर ट्विट करत या चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीचे कौतुक केलं आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या टीमसोबत थिएटरमध्ये दिसत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कांताराचं कौतुक करताना लिहिलं, " माझ्या सहकाऱ्यांसोबत बंगळुरूमध्ये कांतारा हा चित्रपट पाहिला. ऋषभ शेट्टीचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय उत्कृष्ट आहे. या चित्रपटात समृद्ध असलेल्या तुळुवनाडू आणि करावली या परंपरांचे उत्तम चित्रण केले आहे.”

ऋषभ शेट्टीनेही निर्मला सीतारामन यांच्या ट्विटला रिट्विट करत आभार मानले आहेत. अलीकडेच सुपरस्टार रजनीकांत यांनीही कांतारा पाहिल्यानंतर त्याचे कौतुक केले होते.

कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) हे नाव चर्चेत आहे. ऋषभ शेट्टी यानेच ‘कांतारा’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. त्यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि तोच या कथेचा नायक आहे. म्हणजेच, चित्रपटात लीड रोलही त्यानेच साकारला आहे .कांतारा दक्षिणेत इतका यशस्वी झाला की निर्मात्यांनी तो हिंदीत डब करून सिनेमागृहात प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Tollywoodनिर्मला सीतारामनसेलिब्रिटी