जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर अनेकांनी समर्थनार्थ आणि विरोधात लिहिले आहे. हिंदुविरोधी, कडवे मुस्लीमधार्जिणे, अज्ञानी अशा स्वरुपाचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हल्लेखोरांना समर्थन देऊ नका असेही यात म्हटले आहे.Ignorance thy name is right wingers !! Khiljis were not Mughal. Actually they existed around two hundred years before Mughal dynasty .— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 31, 2017
राजपूत करणी सेनेच्यावतीने राणी पद्मिनी यांचा चुकीचा इतिहास चित्रपटात दाखविण्यात येत असल्याच्या कारणावरून संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यात आली होती. यानंतर बॉलिवूडमधील अनेक जण भन्साळींच्या समर्थनार्थ पुढे आले. सुशांत सिंग राजपूत याने आपले आडनाव काढून टाकले. अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अभिनेते ऋषी कपूर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला होता. अनेकांनी राजस्थानमध्ये यापुढे शूटिंग करण्यात येऊ नये अशी मागणीही केली.संजय लीला भन्साळी यांनी पद्मिनीच्या पात्राबाबत कोणतीही चुकीची माहिती दाखविण्यात येणार नाही, असे आश्वासन राजपूत करणी सेनेला दिले आहे. या चित्रपटात कोणत्याही काल्पनिक स्वरुपात पद्मिनी आणि अल्लाउद्दीन यांच्यात प्रेमप्रकरण दाखविण्यात येणार नाही, असेही यात दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे.Padmawat is the first Hindi novel written by Malik Mohammad Jaisi during Akbar's era .It is not history but pure fiction like Salim Anarkali— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 31, 2017