Join us

ऋषी कपूर यांचा अपमान करणारं ट्विट करून केआरके फसला, 30 एप्रिलच्या ट्विटविरोधात एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:12 AM

अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. अशात बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणे त्याचा महागात पडले. 

ठळक मुद्देकेआरके कायम त्याच्या नको त्या ट्विटमुळे चर्चेत राहतो. बॉलिवूड स्टार्सवर अनेक वादग्रस्त ट्विट लिहून यापूर्वी त्याने वाद ओढवून घेतले आहेत, यासाठी तो अनेकदा ट्रोलही झाला आहे.

अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. अशात बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणे त्याचा महागात पडले. मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेना कोअर कमेटीचे सदस्य राहुल कनल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,कमाल आर खानने त्याच्या 30 एप्रिलला ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते.

काय केले होते ट्विटएकीकडे संपूर्ण देश इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनामुळे शोकमग्न असताना दुसरीकडे स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा समीक्षक म्हणवणारा केआरके अर्थात कमाल राशीद खानने इरफान व ऋषी कपूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे तो ट्रोलही झाला होता. इतकेच नाही तर  युजर्सनी केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड करण्याची मागणी लावून धरली होती. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच केआरकेने ट्विट डिलीट केले होते. इरफान खानच्या निधनाने चाहते दु:खात असतानाच अचानक ऋषी कपूर रूग्णालयात भरती असल्याची बातमी आली होती. या बातमीने सगळ्यांची चिंता वाढवली असतानाच केआरकेने ट्विट केले़ होते.

 ‘ऋषी कपूर एचएन रिलायन्स रूग्णालयात भरती आहेत आणि मला त्यांना काही सांगायचे आहे, सर, बरे होऊनच परत या, निघून जाऊ नका, कारण दारूची दुकाने आता केवळ 2-3 दिवसांतच खुलणार आहेत,’ असे ट्विट त्याने केले होते. 29 एप्रिलला मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटाला त्याने हे ट्विट केले होते, (30 एप्रिलला सकाळी पावणे नऊच्या सुमारास ऋषी कपूर यांचे निधन झाले.) त्याच्या या ट्विटनंतर नेटक-यांनी केआरकेला चांगलेच फैलावर घेतले होते.केआरके कायम त्याच्या नको त्या ट्विटमुळे चर्चेत राहतो. बॉलिवूड स्टार्सवर अनेक वादग्रस्त ट्विट लिहून यापूर्वी त्याने वाद ओढवून घेतले आहेत, यासाठी तो अनेकदा ट्रोलही झाला आहे.

मला माहितीये पुढचा नंबर कोणाचा?

या ट्विटआधी केआरकेने आणखी एक ट्विट केले होते. ‘कोरोना काही दिग्गजांना घेतल्याशिवाय जाणार नाही, असे मी काही दिवसांपूर्वीच म्हणालो होता. मी त्या व्यक्तिंची नावे लिहिली नव्हती, कारण मग लोक मला शिव्या घालायला लागतात. पण इरफान खान व ऋषी कपूर जाणार, हे मला माहित होते. यानंतर पुढचा नंबर कोणाचा, हेही मला ठाऊक आहे,’ असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले होते. 

टॅग्स :कमाल आर खानऋषी कपूर