अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी अशा सर्व जॉनरचे सिनेमे बनवणाºया बॉलिवूडला आता पौराणिक कथांची भुरळ पडली आहे. काही दिवसांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारने अमेरिकेतील डी23 एक्स्पोमध्ये काही भारतीय प्रोजेक्टची घोषणा केली होती. यात ‘महाभारत’ सीरिजचा उल्लेख होता. आता महाभारतावर (Mahabharat) चित्रपट बनवला जातोय आणि या भव्यदिव्य चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जाणार आहे. किती तर तब्बल 700 कोटी. होय, 700 कोटींच्या बजेटमध्ये बनणारा हा पहिला 5 डी सिनेमा असणार आहे.
फिर हेरा फेरी, वेलकम सारखे सिनेमे बनवणारे प्रोड्यूसर फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) हे ‘महाभारत’वर चित्रपट बनवणार आहेत. तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. पण या चित्रपटाची चर्चा जोरात आहे.बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, फिरोज नाडियाडवाला यांनी या चित्रपटावर काम सुरू केलं आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. अशात 2025 साली हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असेल, असा अंदाज आहे. हिंदी भाषेशिवाय अन्य भाषांमध्येही हा सिनेमा बनणार आहे. 3 तासांचा हा सिनेमा हॉलिवूडच्या द लॉर्ड ऑफ रिंग्स, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वॉर्स, हॅरी पॉटरसारख्या चित्रपटांच्या तोडीस तोड असतील, असंही म्हटलं जात आहे.
अक्षय, रणवीर... अशी असेल स्टारकास्ट?फिरोज नाडियाडवालाच्या या चित्रपटाची कास्टिंग लवकरच सुरू होणार आहे. चर्चा खरी मानाल तर मेकर्स अक्षय कुमार (Akshay Kumar ), अजय देवगण (Ajay Devgn), रणवीर सिंग (Ranveer Singh ), अनिल कपूर, नाना पाटेकर अशा अभिनेत्यांना घेऊन हा चित्रपट बनवू इच्छितात. आता हे खरं झालं तर कोण अभिनेता कोणतं पौराणिक पात्र साकारेल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. या चित्रपटासाठी लीड हिरोईन्सच्या नावांचीही चर्चा जोरात आहे.
1965 मध्ये बनला होता ‘महाभारत’वर पहिला सिनेमाहोय, महाभारतावर आत्तापर्यंत अनेक मालिका बनल्या. पण चित्रपट फक्त एकच बनला. 1965 साली ‘महाभारत’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. खास बात म्हणजे, फिरोज नाडियाडवालाचे वडील ए जी नाडियाडवाला यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. यात प्रदीप कुमार, पद्मिनी व दारा सिंग सारखे कलाकार होते. सूत्रांच्या मते, हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता हाच कित्ता एजींचा मुलगा फिरोज नाडियाडवाला गिरवणार आहेत.