दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफमधली कोल्ड वॉर सगळ्यांच माहिती आहे. यामागचे कारण होता दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर. दीपिका - रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिनाची एंट्री झाली. तिथूनच दीपिका-कॅटमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. गत १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन झाले. हे रिसेप्शन खास बॉलीवूडमधील कलाकारांसाठी ठेवण्यात आले होते.