Join us  

​संजय दत्तच्या ‘भूमी’चा फर्स्ट लूक आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 8:04 AM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. संजयचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘भूमी’ची त्यामुळेच प्रेक्षक ...

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. संजयचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘भूमी’ची त्यामुळेच प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अर्थात हा चित्रपट पाहायला आपल्याला सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. पण या चित्रपटाचा फर्स्ट लूक म्हणाल, तर तो आलाय. होय, आज ‘भूमी’चा फर्स्ट लूक जारी झाला. हे पोस्टर निश्चितपणे तुमची उत्सुकता वाढवणारे आहे.या पोस्टरमध्ये संजयच्या तोंडातून रक्त येत असलेले दिसतेय. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटामुळे संजय चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे संजय बºयाच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. गतवर्षी संजय आपली शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. यापूर्वी आमिर खानच्या ‘पीके’मध्ये संजय अ्नखेरचा दिसला होता. या चित्रपटात संजयची छोटीशी पण तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका होती.‘भूमी’चे बोलायचे झाल्यास, या चित्रपटात संजयशिवाय आदिती राव हैदरी हिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाबद्दल अलीकडे संजयनेच माहिती दिली होती. ‘भूमी’ एक संवेदनशील ड्रामा आहे. वडिल आणि मुलीची कथा यात दिसणार आहे. नक्कीच या चित्रपटाबद्दल संजय प्रचंड उत्सूक आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. ओमंग कुमार यांनी यापूर्वी प्रियांका चोप्राचा ‘मॅरी कॉम’ आणि ऐश्वर्या राय बच्चनचा ‘सरबजीत’ असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. येत्या २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचा फर्स्ट लूक कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा. लवकरच संजय ‘तोरबाज’ या चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे. हा चित्रपट चाईल्ड सुसाईड बॉम्बरवर आधारित आहे.