Join us

FIRST PICS OUT! ​कंगना राणौत झाली मावशी; बहीण रंगोली चंदेलने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:01 AM

एक गोड बातमी आहे. होय, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आई झालीय आणि कंगना राणौत मावशी. आज सकाळी रंगोलीने ...

एक गोड बातमी आहे. होय, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आई झालीय आणि कंगना राणौत मावशी. आज सकाळी रंगोलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रंगोलीने खुद्द टिष्ट्वटरवरून ही गोड बातमी शेअर केली. केवळ इतकेच नाही तर आपल्या बाळाचा पहिली झलकही सोशल मीडियावर शेअर केली. बाळाचे नावही तिने जाहिर केले. रंगोलीने आपल्या बाळाचे ‘पृथ्वीराज’ असे नामकरण केले आहे. निश्चितपणे राणौत व चंदेल कुटुंबासाठी हा सेलिब्रेशन टाईम आहे.यापूर्वी रंगोलीचा गर्भपात झाला होता. त्यामुळे  यावेळी डॉक्टरांनी तिला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. रंगोली आपल्या घरगुती कामांशिवाय कंगनाच्या प्रोफेशनल गोष्टी सांभाळते. पण रंगोलीला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यावर कंगनाला स्वत:साठी एक टीम हायर करावी लागली होती. माझ्या कामापेक्षा रंगोलीचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे,असे यावेळी कंगना म्हणाली होती.ALSO READ: कंगना राणौतने पुन्हा केला इंडस्ट्रीवर ‘हल्ला’!!रंगोलीने सन २०११ मध्ये दिल्लीचा बिझनेसमॅन अजय चंदेल याच्यासोबत लग्न केले होते. कंगनाने स्वत: रंगोलीच्या लग्नाची जबाबदारी सांभाळली होती. कपड्यांपासून तर लग्नमंडपाच्या सजावटीपर्यंत सगळे काही कंगनाने केले होते. २००६ मध्ये रंगोलीवर अ‍ॅसिड अटॅक झाला होता. या घटनेनंतर रंगोलीला प्रचंड दु:ख, वेदना आणि ५७ आॅपरेशनमधून जावे लागले. एका मुलाखतीत रंगोलीने आपली ही दु:खान्तिका बोलून दाखवली होती. माझ्या डोळ्यांची ९० टक्के दृष्टी गेली होती.माझा एक ब्रेस्ट खराब झाला होता. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर मला श्वास घ्यायला प्रचंड वेदना व्हायच्या. कारण श्वसननलिकेला डॅमेज झाली होती. आयुष्याच्या प्रत्येक श्वासासाठी माझा संघर्ष सुरु होता. आॅपरेशन..प्लॅस्टिक सर्जरीही सोपी नव्हती. तीन महिने आरशासमोर उभे राहण्याची हिंमतही मी केली नाही. कंगना त्यावेळी बॉलिवूडमध्ये संघर्ष करीत होती. पण तिने मला आधार दिला. मला नैराश्यातून बाहेर काढले. एक नवे आयुष्य दिले. २३ वर्षांच्या त्या वयात मी भोगलेला शारिरीक आणि मानसिक त्रास कुणाच्याही वाट्याला येऊ नये,असे रंगोलीने या मुलाखतीत म्हटले होते.