सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे प्रत्येक जण उघडपणे आपलं मत व्यक्त करु लागला आहे. परंतु, बऱ्याचदा काही जण या माध्यमाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. अनेकदा काही मंडळी उघडपणे कलाकार वा सेलिब्रिटींना त्यांच्या ट्रोल करतात. इतकंच नाही तर काहीवेळा हे ट्रोलिंग सेलिब्रिटींच्या खासगी जीवनावरुनही केलं जातं. त्यामुळे 'थ्री ऑफ अस' या सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांना या ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे. अलिकडेच त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांची त्यांनी कानउघडणी केली आहे.
एखादा सिनेमा फसला किंवा तो आवडला नाही तर नेटकरी सिनेमाच्या संपूर्ण टीम, त्यातील कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल करु लागतात. यात अनेकदा हे ट्रोलिंग पर्सनल लेव्हलवरही केलं जातं. मात्र, या ट्रोलिंगचा परिणाम कलाकार आणि त्यांच्या कुटुंबावरही होत असतो. यावरच अविनाश अरुण यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
"बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि तो असावा .पण बोलताना कोणाच्या पर्सनल इमेजला किंवा मनाला इजा पोहोचेल असं नसावं. एक हेल्दी डिस्कशन असायला हवं म्हणजे चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये .मुळात हे नातं असलंच पाहिजे म्हणजे कोणतेही गोष्ट आपण मोकळेपणाने बोलू शकतो . पण, फक्त बोलताना भान जपलं पाहिजे असं मला वाटत. कारण प्रत्येकाच्या भावनांचा विचार केला पाहिजे. कारण कधी कोणावर कसा आघात होईल हे सांगता येत", असं अविनाश म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "तुम्हाला तुमचं मत किंवा विचार नीट पोहोचवायचं असतील तर त्यासाठी शब्दांची निवड करणं गरजेचं आहे . मुळात तुम्ही एखद्याचा अपमान करत नाही तर तुमचा स्वत:चाच करत असता. त्यामुळे आधी स्वतःला आदर द्या तरच मग दुसऱ्याला देता येईल."
'पाताललोक 2' विषयी दिग्दर्शकांचा मोठा खुलासा; अशी असेल या सीरिजची स्टोरी
दरम्यान, अविनाश अरुण यांची थ्री ऑफ अस हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचं बरचसं चित्रीकरण कोकणात झालं आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा साजेसा अभिनय यामुळे हा सिनेमा लोकप्रिय होत आहे.