Join us

50 रुपये पहिला पगार, वर्षाला 300 कोटी कमावणाऱ्या शाहरुखची 'लय मोठी' संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 6:32 PM

शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात करताना, 50 रुपये पहिला पगार घेतला. त्यावेळी, ताजमहालला भेट शाहरुखने भेट दिली होती. मात्र, शाहरुखकडे आज कोट्यवधींची संपत्ती आहे.

ठळक मुद्देशाहरुखकडे लक्झरी गाड्यांचा ताफा असून बाईक्स आणि चारचाकी गाड्यांची मोठी फौज आहे. चित्रपटात येण्यापूर्वी त्याने छोट्या पदड्यावरही काम केलं आहे. शाहरुखच्या पहिल्या टीव्ही सिरियलचं नाव फौजी असं होतं.

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान, बादशहा शाहरुख खान गेल्या 25 वर्षांपासून बॉलिवूडवर राज करतोय. त्यामुळे, बॉलिवूडमध्ये शाहरुखच्या नावाची नेहमीच चर्चा असते. 100 पेक्षा अधिक चित्रपट केलेल्या शाहरुख खानला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर, आत्तापर्यंत 14 फिल्मफेअर पुरस्कारही शाहरुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर पटकावले आहेत. शाहरुखचे कोट्यवधी फॅन फॉलोवर्स आहेत, त्यामुळेच त्यााच इन्कमही कोट्यवधींच्या आकड्यातच आहे. 

शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात करताना, 50 रुपये पहिला पगार घेतला. त्यावेळी, ताजमहालला भेट शाहरुखने भेट दिली होती. मात्र, शाहरुखकडे आज कोट्यवधींची संपत्ती आहे. मायानागरी मुंबईत मन्नत नावाचा बंगलाही त्याच्या चाहत्यांसाठी ताजमहालएवढंच प्रेक्षणीय स्थळ आहे. एक रिपोर्टनुसार सध्या शाहरुख खान एका चित्रपटाला 25 कोटी रुपये घेतो. कधीकाळी आपल्या आईकडून 1 हजार रुपये घेऊन प्रेमिका गौरीच्या शोधात शाहरुख मुंबईत पोहोचला होता. मात्र, आज शाहरुखची लाईफ लक्झरी आहे. 

शाहरुखकडे लक्झरी गाड्यांचा ताफा असून बाईक्स आणि चारचाकी गाड्यांची मोठी फौज आहे. चित्रपटात येण्यापूर्वी त्याने छोट्या पदड्यावरही काम केलं आहे. शाहरुखच्या पहिल्या टीव्ही सिरियलचं नाव फौजी असं होतं. त्यामध्ये, एका सैनिकाची भूमिका शाहरुखने बजावली आहे, सन 1989 मध्ये ही मालिका प्रदर्शित होत होती. दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून शिक्षण घेणाऱ्या शाहरुखचा मन्नत हा बंगला जगातील टॉप 10 बंगल्यांमध्ये एक आहे. हा बंगला पूर्णपणे व्हाईट मार्बल्सने बनलेला आहे. 

हजारो लोक दररोज शाहरुखचा बंगला पाहण्यासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे शाहरुखही त्यांना हात दाखवून अभिवादन करतो. या बंगल्याची सध्याची किंमत 250 कोटी रुपये एवढी आहे. शाहरुख खान एकूण 5067 कोटी रुपयांचा मालक असून वर्षाला 300 कोटी रुपये कमावतो. शाहरुखचा महिन्याला इन्कम 20 कोटीपेक्षा अधिक आहे.  

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानमुंबईपैसासिनेमा