Join us

डॉक्टरची डिग्री घेतल्यानंतर सौंदर्या शर्मा बनली अभिनेत्री, वाचा तिचा संपूर्ण प्रवास

By गीतांजली | Published: March 13, 2019 5:22 PM

सौंदर्या शर्माने 'रांची डायरिज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. डेब्यूमध्ये तिने रसिकांची मनं जिंकली. तिच्या सिने इंडस्ट्रीतल्या प्रवासाविषयी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा. 

सौंदर्या शर्माने 'रांची डायरिज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. डेब्यूमध्ये तिने रसिकांची मनं जिंकली. तिच्या सिने इंडस्ट्रीतल्या प्रवासाविषयी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा. 

'रांची डायरिज' सिनेमातून तू बॉलिवूडमध्ये डेब्यू केलास, तुझ्या या अनुभवाबाबत काय सांगशील ? मी दिल्लीतून मुंबईत स्वप्न घेऊन इथं आले. मग माझ्या इथल्या प्रवासाला सुरुवात झाली. हे सगळं खूपच छान वाटत. माझ्या करिअर सुरुवात एक बॉलिवूडच्या सिनेमातून झाली, माझे कोणतेही फॅमिली कनेक्शन बॉलिवूडशी नसताना हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. मला रांची डायरिजमधून एक ओळख मिळाली. 

 सध्या बरेचसे स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करतायेत, तुझे फिल्मी बॅकग्राउंड नसताना तुझ्यासाठी डेब्यू करणे किती चॅलेंजिंग होते ?सध्या वेबसीरिजचे एक चांगले माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मी असे नाही म्हणणार अशक्य आहे. तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्हाला संधी मिळते शेवटी प्रेक्षक सगळं ठरवत असतात. हे खरं आहे की स्टारकिड्सना संधी इतरांच्या तुलनेत जास्त मिळते यात काही शंका नाही. तर आमच्यासाठी स्ट्रगल थोडे जास्त असते मुंबईतल्या एखाद्या ऑडिशनपर्यंत पोहोचणे ही आमच्यासाठी चॅलेंजपेक्षा कमी नसते. मी ज्यावेळी दिल्लीतून मुंबईत आले त्यावेळी मला हेसुद्धा माहिती नव्हते ऑडिशन कुठे होतात मी गूगलच्या सहाय्याने ते शोधण्याचा प्रयत्न करायचे. 

तू मेडिकलचे शिक्षण घेतलेले असताना अभिनयात करिअर करण्याचा निर्णय का घेतलास ? तुझ्या दिल्लीत ते मुंबईत प्रवासाविषयी का सांगशिल ?या प्रवासात मी बरेच चढ-उतार बघितले पण तरीही मी म्हणेन मा हा  माझा प्रवास चांगला होता. मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. अभिनय माझे पॅशन आहे. पण दुर्देवाने (हसत-हसत) मी अभ्यासात हुशार असल्यामुळे मला डेंटिसचे शिक्षणपण पूर्ण करावे लागले. पण माझं अभिनेत्री होण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हत. त्यामुळे मी मुंबईत आले आणि मला फक्त स्टार नाही तर माझे स्वप्न सुपरस्टार होण्याचे आहे. 

शिक्षण झाल्यावर तू ज्यावेळी घरी सांगितलेस तुला अभिनयात करिअर करायचे आहे, त्यावेळी तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?मी खूप ओरडा मिळाला मार खाता खाता (हसत-हसत) वाचले होते, माझे वडिल म्हणाला जर अभिनेत्रीच बनायचे होते तर डॉक्टर का झालीस. माझा निर्णय ऐकून त्यांना काही वेळासाठी धक्का बसला होता. पण आता ते मी घेतलेल्या निर्णय खूप खूश आहेत.

 

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे जर तुला बायोपिकची ऑफर आली तर तुला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल ?अमृता शेरगिल यांचे मी ऑटो बायोग्राफि वाचली आहे आणि ती मला भावली सुद्धा तर मला त्यांच्या बायोपिकमध्ये काम करायला नक्की आवडेल. माझी लिस्ट फार मोठी आहे त्यामुळे मला अनेक जणांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल. 

टॅग्स :सौंदर्या शर्माबॉलिवूड