Join us  

‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 11:39 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे.

ठळक मुद्दे‘2.0’चे हे गाणे रिलीज झाल्याबरोबरच या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. अवघ्या काही तासातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ‘2.0’ हा चित्रपट या वषीर्चा बिग बजेट चित्रपट मानला जातोय. या चित्रपटावर कधी नव्हे इतका ६०० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ‘तु ही रे’ असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटाच्या तामिळ आणि तेलगु व्हर्जनचे लिरिक्स/ आॅडिओ व्हर्जनमध्ये हे गाणे आधीच रिलीज झाले होते. आता या गाण्याचे हिंदी व्हर्जन रिलीज करण्यात आले आहे.या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात खास रोबोटिक्स डान्स पाहायला मिळतोय. अरमान मलिक व शषा तिरूपतीने गायलेल्या या गाण्याबद्दलची आणखी एक खास बाब म्हणजे, हे एक गाणे बनवण्यासाठी 20 कोटी रूपये खर्च करण्यात आले. म्हणजे, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सगळ्यांत महागडे गाणे आहे.  ‘2.0’चे हे गाणे रिलीज झाल्याबरोबरच या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. अवघ्या काही तासातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत लाखो चाहत्यांनी हे गाणे पाहिले आहे.

‘2.0’ हा चित्रपट या वषीर्चा बिग बजेट चित्रपट मानला जातोय. या चित्रपटावर कधी नव्हे इतका ६०० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाने प्री-बुकिंगच्या माध्यमातून प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे. ‘2.0’च्या ट्रेलरनेलाही सोशल मीडियावर असाच प्रतिसाद मिळाला होता. यावरुनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची असलेली उत्सुकता लक्षात येते. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व रजनीकांत पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात अक्षय क्रोमॅन बनला आहे तर रजनीकांत डबलरोलमध्ये आहे.

टॅग्स :2.0रजनीकांतअक्षय कुमारएमी जॅक्सन