चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाणे दिया मिर्जा तिच्या घटस्फोटावर बोलली आहे. दीयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पती साहिल संघापासून घटस्फोट घेतला. दीया म्हणाली, "माझ्या आई-वडिलांनी 34 घटस्फोट घेतला. तेव्हा मी फक्की चार वर्षाची होती. इतक्या लहान वयात आईवडिलांना वेगळे होतानाचा त्रास मी सहन करून शकले. आणि आज वयाच्या 37 व्या वर्षी मी माझ्या घटस्फोटातून स्वतःलाही सावरत आहे. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले असले तरीही त्याचा आयुष्यावर थोडातरी फरक होतोच हे नाकारू शकत नाही. दिया आणि साहिल दोघेही बिझनेसपार्टनर होते. घटस्फोट झाल्यानंतर आता त्यांच्या व्यवसायात चढउतार येत असल्याचे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार दीया मिर्झाचं लग्न तुटण्यामागे कनिका ढिल्लन कारणीभूत असल्याचं बोललं जातं. कनिका ढिल्लनचं दीया मिर्झाचा नवरा साहिलसोबत अफेयर आहे. ज्यामुळे दीया नवऱ्यापासून वेगळे झाले. दीया मिर्झाला कनिका व साहिल सांगा यांच्या अफेयरबद्दल समजलं होतं. त्यानंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.