भर कार्यक्रमात ढसाढसा रडली मलायका, पहिल्यांदाच समोर आल्या 'मुन्नी'च्या या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:58 PM2019-11-06T15:58:55+5:302019-11-06T16:01:29+5:30
त्या काळात वर्णभेद केला जायचा.काळ्या रंगाच्या मुलींकडे एका वेगळ्याच दृष्टीकोणाने बघितले जायचे.
‘छैया छैया’, ‘गुड नाल इश्क मीठा’, ‘माही वे’, ‘काल धमाल’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणे ऐकताच आज आपल्याला मलायका नाही आठवली तरच नवल. आज बॉलिवूडमध्ये मलायकाने आपले स्थान निर्माण केले आहे. प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रगल करावे लागले आहेच. स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही मग मलायकाला तरी कसा चुकणार. आज फेमस सेलिब्रेटी बनल्यानंतरही याच स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी मलायकाच्या मनात तशाच ताज्याच आहेत.
गो-या रंगाविषयी भारतीयांना नेहमीच आकर्षण वाटते. सौदर्य म्हणजे जणु काही गोरा रंगच असा सर्वसामान्य समज. गो-या रंगाला नेहमीच वाहवा मिळत असताना सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये कधी त्यांच्या रंगामुळे आपण कमी असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात रंगभेदाचा अनेकांना सामना करावा लागतो. त्यातही चंदेरी दुनिया म्हणजेच सिनेसृष्टीत तर चांगल्या दिसण्यालाच जास्त पसंती दिली जाते. नुकतेच मलायका अरोरानेही असाच किस्सा सांगितला आहे. सावळा रंग असल्यामुळे तिलाही बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरूवातीला खूप स्ट्रगल करावा लागला आहे.
एका कार्यक्रमात मलायकाने तिचे स्ट्रगल डेजविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
या गोष्टी सांगता सांगता ती भावूक झाली आणि तिला अश्रृ अनावर झाले. पुढे तिने सांगितले की, त्या काळात वर्णभेद केला जायचा.काळ्या रंगाच्या मुलींकडे एका वेगळ्याच दृष्टीकोणाने बघितले जायचे. टॅलेंट असून माझ्या सावळ्या रंगामुळेच मला कित्येक दिवस काम मिळालेच नव्हते. आजचा काळ हा वेगळा आहे. आता विचारही प्रगल्भ होत आहेत. त्यामुळे वर्णभेद न करता कलागुणांना महत्त्व दिले जाते. आज मी खूप लोकप्रिय सेलिब्रेटी बनली आहे. माझ्या नावानेच मला ओळखले जाते. या गोष्टी कमावण्यासाठी मलाही खूप मेहनत करावी लागली आहे.