Join us

फिट है बॉस ! सोनू सूदची पिळदार बॉडी पाहून, फॅन्स झाले क्रेझी, फोटो शेअर होताच मिळाले 8 लाखांहून अधिक Likes

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 6:18 PM

Sonu Sood Fitness Funda : विशेष म्हणजे सोनू सूद शाकाहारी आहार घेतो. अतिशय साध्या पद्धतीचे जेवन तो करतो. शाकाहारी जेवण करतच त्याने ही इतकी चांगली पिळदार बॉडी कमावली आहे. 

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो.असाच अंदाज आता सोनू सूदचाही समोर आला आहे. सोनू सूददेखील इतरांप्रमाणे फिटनेसफ्रिक अभिनेता आहे.इर गोष्टींप्रमाण फिटनेसवरही तो प्रचंड मेहनत घेतो. व्यायाम,फिटनेस हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

आज पर्यंत कधीच सोनू सूदचा असा अंदाज पाहायला मिळाला नव्हता. पहिल्यांदाच सोनू सूदची पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही  वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही  घायाळ करेल अशीच आहे.

 

आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. नित्यनियमाने तो वर्कआऊट करतो. सध्या सोनू सूदचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सोनू सूद शाकाहारी आहार घेतो. अतिशय साध्या पद्धतीचे जेवन तो करतो. शाकाहारी जेवण करतच त्याने ही इतकी चांगली पिळदार बॉडी कमावली आहे. 

 

सोनू सूद पुन्हा बनला मसिहा, एक लाख लोकांना देणार नोकरी, बदलवणार 10 करोड लोकांचे आयुष्य

सोनू सूद खऱ्या आयुष्यात देखील नायक असल्याचे त्याने लॉकडाऊनमध्ये सिद्ध केले आहे. त्याने लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना मदत केली होती. तसेच तो गरिबांना अनेक मार्गांनी नेहमीच मदत करत असतो. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलणार आहे.तो आता एक लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लान आखत आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने या ट्वीटद्वारे सांगितले आहे की, नवीन वर्ष.... नवीन स्वप्नं... नवीन नोकरीच्या संधी... आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत... गुडवर्कर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमचे भविष्य उज्जवल करा.

सोनूने या अ‍ॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अ‍ॅपद्वारे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड खूश झाले आहेत. सोनूच्या या प्रयत्नसाठी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत.

टॅग्स :सोनू सूद