Join us

रणवीर सिंगच्या 'गली बॉय'बाबत ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 20:00 IST

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गली बॉय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमाचे म्युझिक लाँच झाले आहे.

ठळक मुद्देपहिल्यांदाच एका सिनेमात पाच पेक्षा जास्त रॅपर दिसणार आहेत डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गली बॉय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमाचे म्युझिक लाँच झाले आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार आहे. या सिनेमाच्या म्युझिक लाँच दरम्यान रॅपर डिवाईन आणि नैजीसह अन्य रॅपरनी देखील यावेळी रॅप केले. 

पहिल्यांदाच एका सिनेमात पाच पेक्षा जास्त रॅपर दिसणार आहेत. डिवाईन व नैजी हे दोघेही मुंबईच्या झोपडपट्टी राहिलेले आणि पुढे रॅपच्या दुनियेत धूम करणारी दोन नावे आहेत. अतिशय संघर्षाने डिवाइन व नैजीने आपली ओळख निर्माण केली. ‘गली बॉय’ हा चित्रपट मुख्यत: याच दोघांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे.२६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीरमधील अभिनयाव्यतिरिक्तचे गुणही पाहायला मिळाले. यापूर्वी ‘गली बॉय’मधील ‘असली हिप हॉप’ आणि ‘अपना टाईम आयेगा’ ही गाणी प्रदर्शित झाली आहेत.या गाण्याला रणवीरच्या चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंग