Join us

स्टार बनताच रानू मंडलबाबत पसरल्या ‘या’ ५ अफवा ज्या ठरल्या खोट्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:45 PM

रानू मंडल लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गात होती, त्याचा व्हिडिओ शूट करुन अतींद्र चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर रानू मंडल इंटरनेट स्टार बनली. मात्र जशीही रानू दी स्टार झाली तिच्याबाबतीत काही अफवादेखील पसरल्या, ज्या खोट्या ठरल्या. जाणून घेऊया त्या अफवांबाबत...

-रवींद्र मोरेकधी रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणणारी ५९ वर्षीय रानू मंडलचे आयुष्य रातोरात बदलेल असा कोणी विचारही केला नव्हता. पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर रानू मंडल लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गात होती, त्याचा व्हिडिओ शूट करुन अतींद्र चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर रानू मंडल इंटरनेट स्टार बनली. मात्र जशीही रानू दी स्टार झाली तिच्याबाबतीत काही अफवादेखील पसरल्या, ज्या खोट्या ठरल्या. जाणून घेऊया त्या अफवांबाबत...* सलमान खानने अलिशान घर देणेस्टार झाल्यानंतर रानू मंडलबाबत सर्वप्रथम सोशल मीडियावर अशी बातमी पसरली की, सलमानने रानू मंडलला ५५ लाखाचे एक अलिशान घर दिले. एवढेच नाही तर आपल्या आगामी ‘दबंग 3’ मध्ये रानूला गाण्याचीही संधी दिली. पश्चिम बंगालच्या राणाघाट स्थित एका क्लबचा सदस्य विक्की बिश्वासने सांगितले की, ‘आमच्या क्लबच्या दोन सदस्यांनी रानूचा व्हिडिओ राणाघाट स्टेशनवर शूट केला होते जे व्हायरल झाले आहेत. तेव्हापासून आम्ही सातत्याने तिच्यावर लक्ष ठेवून आहोत. सलमान खानकडून रानूला ५५ लाखाचे घर देण्याची बातमी खोटी आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे.’* हिमेशने गाण्यासाठी लाखो रुपये देणेदुसरी अफवा तेव्हा पसरली जेव्हा हिमेश रेशमियाने त्याचा आगामी 'हैप्पी हार्डी एंड हीर' या चित्रपटात रानूला गाण्याची संधी दिली. रेकॉर्डिंगचा व्हिडिओदेखील हिमेशने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. तेव्हा रानूच्या बाबतीत एक बातमी अशी व्हायरल होत होती की रानूला ‘तेरी मेरी..’ या गाण्यासाठी हिमेशनने सुमारे ६ ते ७ लाख आॅफर केले, मात्र रानूने हे पैसे घेण्यास नकार दिला. हिमेशने रानूला हे पैसे जबरदस्ती दिलेत आणि म्हणाला की, आता बॉलिवूडमध्ये तुम्हाला सुपरस्टार बनण्यास कोणीही थांबवू शकत नाही. मात्र हिमेश किंवा रानूकडून फीजच्या बाबतीत अजून असे कोणतेच वक्तव्य समोर आले नाही. अर्थात ही अफवा देखील खोटी ठरली आहे.* रानूचे गाणे ऐकून सलमानचे रडणेएक अफवा अशी देखील पसरली कील रानू मंडलचे नवे गाणे ‘तेरी मेरी’चा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा त्या गाण्यावरु न सलमान खानचाही एक व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओद्वारा असा दावा केला जात होता की, रानूचे गाणे ऐकून सलमानला रडू कोसळले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, रानूचा आवाज ऐकून सलमान स्वत:ला सांभाळू शकला नाही आणि तो रडू लागला. मात्र या व्हिडिओ बाबतची सत्यता पडताळणी केली असता हा व्हिडिओ एडिट केल्याचे निष्पन्न झाले. एकंदरीत ही अफवादेखील खोटी ठरली.* रानूने १५ लाखाचे घर खरेदी करणेरानू मंडलच्या बाबतीत अजून एक खोटी बातमी पसरवली जात आहे की, हिमेशने रेकॉर्डिंग केलेल्या गाण्यातून रानूला लाखो रुपये दिले आणि तिने त्यातून १५ लाखाचे घर खरेदी केले. हे खरे आहे की, हिमेश रेशमियाने तिच्यासाठी बरेच काही केले आहे. त्याने स्वत:च्या खर्चावर रानूला मुंबई बोलविले, मात्र या व्यतिरिक्त पसरलेल्या बातम्या खोट्या आहेत.* रिअ‍ॅलिटी शोची आॅफर मिळणेअशीही बातमी होती की, रानूला सलमान खानच्या एका रिअ‍ॅलिटी शोची आॅफर मिळाली आहे. शिवाय तिने १५ लाखाची कारदेखील खरेदी केली आहे. मात्र सत्यता पडताळून पाहिली असता, रानूला संबंधीत रिअ‍ॅलिटी शोची कुठलीही आॅफर न मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय तिने कार खरेदी केल्याचीही बातमी खोटी आहे.