Join us

गौरी खानसाठी पाच वर्षांपर्यंत हिंदू बनला होता शाहरूख खान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 6:05 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरीची प्रेमकथा बॉलिवूडमधील एक आदर्श लव्हस्टोरी म्हणून पाहिली जाते.

ठळक मुद्देशाहरूख खान व गौरी २५ ऑक्टोबर १९९१मध्ये अडकले विवाहबंधनात

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरीची प्रेमकथा बॉलिवूडमधील एक आदर्श लव्हस्टोरी म्हणून पाहिली जाते. शाहरुखकडे काहीही नसताना गौरीने त्याला आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडला होता. मात्र, यादरम्यान या दोघांनाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाचा प्रवास प्रचंड खडतर होता, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. या कपलच्या पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरीनिमित्त त्यांचा हाच प्रवास जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

शाहरुखने १८ वर्षांचा असताना गौरीला पहिल्यांदा एका पार्टीत डान्स करताना पाहिले. शाहरूखला ती खूप आवडली. गौरी डान्स करताना लाजत होती. शाहरूखने हिंमत करत गौरीला डान्स करण्यासाठी विचारले. मात्र गौरीने काहीच इंटरेस्ट नाही दाखवला आणि तिने सांगितले की, मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट पाहत आहे. हे ऐकताच शाहरूखच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मात्र प्रत्यक्षात गौरीचा कोणीच बॉयफ्रेंड नव्हता. तिचा भाऊ तिच्यासोबत होता. म्हणून ती खोटे बोलली होती. जेव्हा ही गोष्टी शाहरूखला समजली तेव्हा त्याने गौरीला जाऊन सांगितले की, मलापण तुझा भाऊ समज. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरूवात झाली. गौरीला देखील शाहरूखची स्टाईल व कॉन्फिडंस खूप आवडला. शाहरूख गौरीच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होता. त्याला गौरीने मोकळे केस ठेवलेले आवडत नव्हते व एकटी मुलासोबत बोलणे आवडत नव्हते. हे सर्व पाहून गौरीने रिलेशनशीपमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवस गौरी तिच्या वाढदिवसादिवशी शाहरूखला न सांगता मैत्रिणींसोबत आऊट ऑफ स्टेशन गेली. तेव्हा शाहरूखला समजले की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. शाहरूख आईच्या जास्त जवळ असून त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यावेळी शाहरूखच्या आईने त्याला दहा हजार रुपये दिले आणि तिला शोधून आणायला सांगितले. शाहरूख आपल्या काही मित्रांसोबत गौरीला शहरात शोधण्यासाठी निघाला. मात्र ती कुठेच सापडली नाही. बराच वेळ शोधल्यानंतर ती शाहरूखला एका बीचवर सापडली. त्यावेळी ते दोघे एकमेकांना मिठी मारून खूप रडू लागले. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मात्र, शाहरुख मुस्लीम आणि गौरी हिंदू असल्याने गौरीचे पालक लग्नाला मान्यता देणार नाहीत, याची कल्पना या दोघांना होती. म्हणूनच, गौरीच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी शाहरुखने पाच वर्षे हिंदू असल्याचे नाटक केले. यानंतर शाहरुखच्या स्वभावावर गौरीचे पालक इम्प्रेस झाले आणि २५ ऑक्टोबर १९९१ ते दोघेही विवाहबंधनात अडकले. गेल्या २५ वर्षांपासून ही जोडी बॉलिवूडची मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखली जाते.   

टॅग्स :शाहरुख खानगौरी खान