Join us

फावल्या वेळात खेळले फुटबॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:04 PM

‘तीन’ या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण कोलकता येथील मोहम्मेदन स्पोर्टिंग क्लब येथे करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ...

‘तीन’ या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण कोलकता येथील मोहम्मेदन स्पोर्टिंग क्लब येथे करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन हे खूप खूश होते. अमिताभ यांना फुटबॉल या खेळाविषयी खूप प्रेम आहे. कोलकताच्या या क्लबमध्ये त्यांनी पूर्वी फुटबॉलच्या अनेक सामन्यांना हजेरी लावली आहे. या चित्रीकरणामुळे या सगळ््या आठवणींना उजाळा मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे आणि विशेष म्हणजे या क्लबमध्ये खेळण्याचा आनंदही अमिताभ यांनी चित्रीकरणा दरम्यान लुटला. चित्रीकरणाच्या दरम्यान ब्रेक मिळाल्यानंतर अमिताभ आराम करत नसून ते येथे फुटबॉल खेळत होते. त्यामुळे हे चित्रीकरण त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील असे त्यांचे म्हणणे आहे.