-रवींद्र मोरेयंदा बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट चित्रपट बघावयास मिळाले. चांगल्या कंटेंट्सच्या चित्रपटांची निर्मिती झाल्याने स्टार्स आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करत आहेत. अशातच बॉलिवूड चित्रपटांनी भारतीयांचेच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन केले. म्हणूनच या वर्षाचे कलेक्शन देखील सर्वाेत्कृष्ट राहिले. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांनी विदेशी बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई केली.
* संजूसंजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ चित्रपटाने भारताबरोबरच विदेशातही हाहाकार केला. विशेषत: संजय दत्तचे फॅन्स फॉलोवर्स फक्त भारतातच नसून विदेशातही आहेत, याचाच फायदा या चित्रपटास झाला. या चित्रपटाने विदेशी बॉक्स आॅफिसवर सुमारे ५७८ कोटीची कमाई करत एक रेकॉर्डच केला. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती.
* पद्मावतसुरुवातीपासून हा चित्रपट वादात होता, त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिली. भारतात तर या चित्रपटाने मोठी कमाई केली शिवाय विदेशी बॉक्स आॅफिसवरही सुमारे ५४६ कोटी कमाई करत हा चित्रपट चर्चेत राहिला. यात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
* रेस 3या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या क्वचितच पूर्ण झाल्या. सलमानने तर बºयापैकी निराशा केली होती. तरीही भारतीय बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली. मात्र विदेशी बॉक्स आॅफिसवर या चित्रपटास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. रेस 3 ने सुमारे ३०६ कोटीची कमाई करत विदेशी बॉक्स आॅफिस दणाणून सोडले.
* बागी 2आपले फिटनेस आणि स्टंटबाजीने अवघ्या कमी काळात तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया टायगर श्रॉफच्या ‘बागी 2’ला भारताबरोबरच विदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने विदेशी बॉक्स आॅफिसवर सुमारे २४९ कोटी कमाई करत टायगरची ओळख सातासमुद्रापार निर्माण केली. यात टायगरसोबत दिशा पटानीदेखील होती.
* ठग्स आॅफि हिंदोस्तानप्रेक्षकांच्या उत्सुकतेची घोर निराशा करणारा हा चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी याने चांगली कमाई केली, मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती न झाल्याने या चित्रपटाचा प्रतिसाद हळुहळू कमी झाला. अर्थात याचा परिणाम कलेक्शनवर तर होणारच. हा चित्रपट विदेशी बॉक्स आॅफिसवर फक्त २४४ कोटी कमाई करु शकला. यात आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.