बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. सिनेमाच बजटे कमी ठेवा आणि आयुष्मानला संधी द्या हा सिनेमा हिट होणे हे काही नवीन राहिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात बॉलीवुडचा हिरो नंबर वन बनण्यास आयुषमान आता कोणीही रोखू शकत नाही. कारण त्याने केलेल्या सिनेमांपैकी सगळेच सिनेमा हे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेत. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने आयुषमानने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवून दिली आहे. मुळात आयुषमान रिल लाइफमध्ये जसा आहे किंबहुना त्याहून अधिक चांगला माणूस तो रिअल लाइफमध्येही आहे. याची प्रचितीही वारंवार येते. तुर्तास आयुष्मानची यशोशिखरावर सुरू असलेली घौडदौड पाहता त्याचे सगळेच सिनेमानी 100 कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. त्याने भूमिका साकारेलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
आयुषमान नेहमीच सामान्य व्यक्तीची भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. आता तो त्याच्या चाहत्यांना भविष्यात निगेटिव्ह भूमिका साकारतानाही दिसेल. एका मुलाखतीत आयुष्मानने एक इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, 'रसिकांनी माझी डार्क साइड अद्याप पाहिलेली नाही. त्यामुळे आता माला निगेटीव्ह भूमिका साकारण्याची इच्छा आहे. 'काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड सिनेमा 'जोकर'च्या हिंदी व्हर्जनमध्ये मला निगेटिव्ह भूमिका साकारायची आहे.' तसेच आयुषमानने त्याच्या हिंदी कवितांच्या पुस्तक प्रकाशन करण्याची ईच्छादेखील व्यक्त केली आहे.
आयुष्मानने 2012 साली 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली होती. तेव्हापासून आयुष्मानने 13 सिनेमा केले आहेत. 13 मधून 8 सिनेमा सुपरहिट ठरले आहेत. नजर टाकुयात बॉक्स ऑफिसवर कोण कोणत्या सिनेमांनी गाठला 100 कोटींचा आकडा.
आयुष्मान खुरानाचा रिपोर्ट कार्ड...
बरेली की बर्फ़ी- 34 कोटी
शुभ मंगल सावधान- 41.90 कोटी
बधाई हो- 136.80 कोटी
अंधाधुन- 72.50 कोटी
आर्टिकल 15- 63.05 कोटी
ड्रीम गर्ल- 139.70 कोटी