मी जग सोडून जातेय...! डिप्रेशनशी लढणा-या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:44 PM2020-07-22T16:44:54+5:302020-07-22T16:51:20+5:30
गेल्या दिवसांपासून डिप्रेशनशी लढत असलेल्या एका अभिनेत्रीने पोस्ट केली आणि तिची पोस्ट पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
बॉलिवूड सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने अख्खा देश हळहळला. सुशांतने डिप्रेशनमुळे स्वत:ला संपवले, असे मानले जात आहेत. सुशांत अनेक दिवसांपासून डिप्रेशनशी लढत होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते. मात्र एक क्षण असा आला की, डिप्रेशन हावी झाले आणि सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर डिप्रेशनवर अनेकजण बोलले. अशात आता गेल्या दिवसांपासून डिप्रेशनशी लढत असलेल्या एका अभिनेत्रीने पोस्ट केली आणि तिची पोस्ट पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मी जातेय, असे तिने लिहिले आणि सगळीकडे खळबळ माजली. काही मित्रांनी ही पोस्ट पाहून लगेच तिच्या घराकडे धाव घेतली. सुदैवाने ती सुरक्षित होती.
ही अभिनेत्री म्हणजे कन्नड अभिनेत्री जयश्री. बिग बॉस कन्नडच्या सीझन 3 मध्ये जयश्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
फेसबुकवर आपण जग सोडत असल्याची पोस्ट तिने केली. ‘मी जातेय. गुडबॉय टू धीस *** वर्ल्ड अॅण्ड डिप्रेशन...’ अशी तिची पोस्ट होती. तिची पोस्ट बघून सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या काही मित्रांनी तिच्या घराकडे धाव घेतली. नशिबाने जयश्री सुरक्षित होती. यानंतर जयश्रीने जग सोडून जात असल्याची पोस्ट डिलीट केली आणि एक नवी पोस्ट टाकत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.
जयश्रीची मैत्रिण व अभिनेत्री अश्विती शेट्टी हिने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून जयश्री डिप्रेशनचा सामना करत आहे. कौटुंबिक परिस्थितीसह ती आपल्या कामाबाबतही चिंतेत आहे. मला काहीच चांगलं वाटत नाही आहे असे जयश्रीने अनेकदा मला बोलून दाखवले होते. आणि दरवेळी मी तिला धीर दिला होता. मात्र जयश्री अनेकदा आपला फोन नंबर बदलत राहायची त्यामुळे तिच्या संपर्कात राहणे शक्य होत नव्हते.
पुढे अश्वितीने सांगितले, ‘चार महिन्यांपूर्वी मी जयश्रीला भेटायला तिच्या घरी गेले होते. यावेळी ती आनंदी वाटत होती. मात्र यानंतर काही दिवसांपूर्वी मी तिची पोस्ट वावून तिला मॅसेज केला. यावेळीही आपण ठीक असल्याचेच तिने सांगितले. आज सकाळी तिची पोस्ट पाहिली आणि आम्ही सगळेच घाबरलो. आम्ही तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा ती रूग्णालयात भरती असल्याचे कळले.’