Join us

"४ ते ४४ पर्यंत, नेहमी एकत्र", करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्त करिश्मा कपूरची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:01 IST

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आज ४४ वर्षांची झाली आहे. तिचे चाहते बेबोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. आता अभिनेत्रीच्या बहिणीनेही तिच्यासाठी खास फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडची फॅशन क्वीन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) २१ सप्टेंबर रोजी तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. वहिनी सोहा अली खाननंतर आता करिनाची बहीण करिश्मा कपूर(Karisma Kapoor)नेही बेबोला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर करीना कपूरसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करिश्माने चाहत्यांना करिनाच्या बालपणीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली. करिश्माने करिनाचे बालपणीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील एकामध्ये करीना तिच्या बहिणीच्या मांडीवर बसलेली दिसते आहे, तर ती तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसली.

करिश्माने बहिणीसाठी लिहिली खास पोस्टया फोटोंमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. करीना कपूरने पांढऱ्या शर्टसोबत स्कर्ट परिधान केला आहे. तर करिश्मा काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. त्यांचे केस खूपच लहान आहेत. ही पोस्ट शेअर करताना करिश्माने लिहिले की, 'आम्ही नेहमी ४ ते ४४ तारखेपर्यंत एकत्र वाढदिवस साजरा केला आहे. सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे..' करिश्माच्या या पोस्टवर करिनाच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करताना करिनाची मोठी वहिनी सबा अली खानने लिहिले, 'द बेस्ट'. तर अभिनेता चंकी पांडेने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द बकिंघम मर्डर्स' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये त्याची भूमिका अतिशय दमदार होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकत नाही. लवकरच ही अभिनेत्री अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूर