फुकरे फेम वरुण शर्माविषयीच्या या गोष्टी ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 07:28 AM2018-05-17T07:28:41+5:302018-05-17T12:58:41+5:30
तब्बल १३ वर्षं रंगभूमीवर गंभीर भूमिका साकारल्यानंतर २०१३ मध्ये वरुण शर्माने ‘फुकरे’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यातील चूचाच्या ...
त ्बल १३ वर्षं रंगभूमीवर गंभीर भूमिका साकारल्यानंतर २०१३ मध्ये वरुण शर्माने ‘फुकरे’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यातील चूचाच्या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला. २० मे २०१८ रोजी दुपारी बारा वाजता ‘नए इंडिया का ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल’ असलेल्या ‘अॅण्ड पिक्चर्स’वर ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे. त्यानिमित्ताने वरुण शर्माशी मारलेल्या गप्पा...
‘फुकरे’वगळता तुमच्या टोळीला दुसरं कोणतं नाव योग्य आहे असे तुला वाटतं?
आमच्या टोळीला फुकरे हेच नाव सर्वात योग्य आहे. यापेक्षा वेगळं कोणतंही नाव आमच्या टोळीचा वेडेपणा अचूकपणे व्यक्त करू शकत नाही. फुकरे हा शब्द प्रामुख्याने उत्तर भारतात वापरला जातो; पण आता या चित्रपटामुळे तो जगभर विख्यात झाला आहे.
तुला या चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यात खजिना सापडला, तर तू काय करशील?
मी सर्वप्रथम आमच्या कुटुंबाच्या ज्योतिषाकडे जाऊन या खजिन्याचं काय करायचं, ते त्याला विचारीन; पण मी तो भोली पंजाबनकडे अजिबात घेऊन जाणार नाही, कारण ती तो घेऊन पळून जाईल. तिने जर मला तिच्या पैशांसाठी तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली, तर मी माझ्या आईला त्याबद्दल मत विचारीन आणि तिने जर होकार दिला, तरच मी भोलीशी लग्न करीन.
तुझ्यासमोर एके दिवशी जर खरोखरचा एक वाघ आला, तर तू काय करशील?
मला वाघांची भयंकर भीती वाटते, तेव्हा मी अर्थातच पळून जाईन. माझ्या चूचाच्या व्यक्तिरेखेइतका काही मी वास्तव जीवनात मूर्ख नाहीये.
लोकांना वरूण शर्माच्या कोणत्या तीन गोष्टी ठाऊक नाही?
ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाहिये, पण मी पूर्ण शाकाहारी आहे. पंजाबी असूनही मी शाकाहारी आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. दुसरं म्हणजे मी जमिनीवर गादी घालून झोपतो, पलंगावर नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आजवर माझ्या आयुष्यात कधीच आंबा खाल्लेला नाही.
तू जर मुलगी असतास आणि एका तरुण अभिनेत्याबरोबर तुला डेटवर जाता आलं, तर तू कोणत्या अभिनेत्याची निवड करशील आणि का?
मी जर मुलगी असतो आणि मला जर एका अभिनेत्याबरोबर डेटवर जाता आलं, तर मी वरुण धवनची निवड करीन. कारण त्याच्याइतका आकर्षक, कठोर मेहनत करणारा आणि अफलातून माणूस असलेला अभिनेता मित्र सध्या तरी माझ्या पाहण्यात नाही.
तू जर अभिनेता झाला नसतास, तर कोण झाला असतास?
मला विमानं फार आवडतात, त्यामुळे अभिनेता बनलो नसतो, तर मी पायलट नक्कीच झालो असतो किंवा त्या क्षेत्रात काहीतरी नक्कीच केलं असतं.
या चित्रपटातील चूचाची व्यक्तिरेखा तुला मिळाली नसती, तर तुला कोणती भूमिका रंगवायला आवडली असती?
चूचा नसता, तर मला दोन भूमिका रंगवायला आवडल्या असत्या. एक म्हणजे भोली पंजाबन (रिचा चढ्ढा) कारण ती चित्रपटातील खरी खलनायिका असून कोणताही प्रसंग असला, तरी या मुलांवर तिचंच नियंत्रण असतं. दुसरी व्यक्तिरेखा पंडितजींची आहे.
तू सध्या कोणत्या चित्रपटांमध्ये भूमिका रंगवीत आहेस?
मी ‘फ्राय डे’ या चित्रपटात भूमिका साकारीत असून त्यात माझ्याबरोबर गोविंदाजीही काम करीत आहेत. याशिवाय मी सध्या मॅडॉक फिल्म्स आणि टी सीरिज यांची निर्मिती असलेल्या अर्जुन पटियाळा या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. त्याचे दिग्दर्शक रोहित जुगराज आहेत. यात प्रेक्षकांना दुलजित दूसांज, कृती सनोन आणि मला एकत्र पाहायला मिळेल.
Also Read : वाचा राजकारणात जाण्याविषयी काय सांगतेय रिचा चड्डा